Adani Row: : गौतम अदानींना मोठा झटका! आता टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतूनही झाली हकालपट्टी

हिंडेनबर्गच्या अहवाला नंतर गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली.
Gautam Adani
Gautam AdaniSakal

Gautam Adani : 2023 च्या सुरुवातीस, गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण हिंडेनबर्गच्या अहवाला नंतर गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली. आता ते केवळ टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतूनच नाही तर टॉप-20 मधूनही बाहेर झाले आहेत.

त्याचबरोबर फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आता मुकेश अंबानी यांच्यानंतर 13व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांची संपत्ती एका दिवसात 12.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. तर, अदानी यांना एका दिवसात 10 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले आहे.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग यांच्या अहवालानंतर अदानी समूहाचे अनेक शेअर्स 60 टक्क्यांच्या खाली आले आहेत.

यामुळे ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावरून 21 व्या क्रमांकावर आहे.

Gautam Adani
Adani Group : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे 100 अब्ज डॉलर पाण्यात! मोदी सरकारने सोडले मौन, म्हणाले..

या वर्षी, अदानी यांची मालमत्ता 59.2 अब्ज डॉलरने कमी होऊन 61.3 अब्ज डॉलर झाली आहे. अदानीला अवघ्या एका आठवड्यात सुमारे 52 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत केवळ दोन भारतीय म्हणजेच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची संपत्ती वाढवली होती. त्या वर्षी कमाईतही अदानी पहिल्या क्रमांकावर होते.

हेही वाचा : ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्यासह अमेरिकन अब्जाधीशांसाठी 2022 हे वर्ष वाईट ठरले. उलट आता त्यांचे अच्छे दिन आले आहेत.

अंबानींच्या नेटवर्थही यावर्षी चांगला राहिला नाही. इलॉन मस्क या वर्षात आतापर्यंत 36.5 अब्ज डॉलर्सची कमाई करून पहिल्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी त्यांची संपत्ती 30.7 अब्ज डॉलर्सने आणि जेफ बेझोस यांनी 29.3 अब्ज डॉलरने वाढवली आहे.

या एका महिन्यात मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत 24.1 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या वर्षी अंबानींना 6.78 अब्ज डॉलर आणि अदानींनी सुमारे 60 अब्ज डॉलर गमावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com