Adani Group : अदानींचा पर्दाफाश करून त्यांना अडचणीत आणणारा हिंडेनबर्ग रिसर्च काय आहे?

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी यांना ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
Gautam Adani
Gautam Adani Sakal

Gautam Adani vs Hindenburg : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

या अहवालामुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांची संपत्ती ११३ अब्ज डॉलरवर आली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.

अदानी समूहाने याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. हिंडेनबर्गने ट्विटरवर लिहिले की, अदानी समूहाने अहवालात उपस्थित केलेल्या 88 प्रश्नांपैकी एकही उत्तर दिलेले नाही.

अदानी समूहाला विचारले ८८ प्रश्न?

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारले आहेत. या अहवालात अदानी समूहाला विचारण्यात आले आहे की, गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात दस्तऐवज आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे.

हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचे मेहुणे समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले, असे अनेक प्रश्न हिंडनबर्ग रिसर्च एजन्सीने अदानी समूहाला विचारले आहेत.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

अदानी ग्रुपचे सीएफओ जुगशिंदर सिंग म्हणाले, 'आम्हाला धक्का बसला आहे की, हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी 2023 रोजी आमच्याशी संपर्क साधण्याचा किंवा तथ्यात्मक पडताळणी करण्याचा कोणताही प्रयत्न न करता एक अहवाल प्रकाशित केला आहे.

हा अहवाल चुकीची माहिती देणारा, निराधार आणि बदनामीकारक आहे. ज्याची चाचणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयांनी केली आहे आणि ती रद्दबातल केली आहे. याशिवाय अदानी समूह अमेरिकन फर्मवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे.''

Gautam Adani
Adani Group Share Crash : अडचणीत आणणाऱ्या Hindenburg विरोधात अदानी कायदेशीर कारवाईच्या विचारात

हिंडेनबर्ग रिसर्चचा इतिहास :

हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना २०१७ मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. हिंडेनबर्गने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. ६ मे १९३७ रोजी झालेल्या हायप्रोफाइल हिंडेनबर्ग एअरशिप क्रॅशवरून कंपनीला नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मँचेस्टर टाऊनशिपमध्ये हा अपघात झाला होता. हिंडेनबर्ग रिसर्च कोणत्याही कंपनीत होणारे घोटाळे शोधून काढते आणि नंतर त्याबद्दलचा अहवाल प्रकाशित करते. ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते.

कोण आहेत नॅथन अँडरसन ?

नॅथन अँडरसन हे हिंडेनबर्ग संशोधनाचे संस्थापक आहेत. कनेक्टिकट विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या अँडरसनने फॅक्टसेट रिसर्च या डेटा कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचे काम गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांशी संबंधित होते.

त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये त्यांची शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्च सुरू केली. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन हे यापूर्वी इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक होते. ते हॅरी मार्कोपोलोसला आपला आदर्श मानत.

हॅरी मार्कपौलोस हे विश्लेषक आहेत आणि बर्नी मॅडॉफची फसवणूक योजना उघड करण्यासाठी ओळखले जातात. कंपनीच्या संस्थापकाच्या म्हणण्यानुसार, हिंडनबर्ग हे नाव अपघातावरून पडले आहे. 6 मे 1937 रोजी मँचेस्टर टाउनशिप, न्यू जर्सी येथे झालेल्या हिंडेनबर्ग एअरशिपच्या अपघातावरून हे नाव देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com