जागतिक मंदी येणार

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

जगभर फैलाव झालेल्या कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे. याचा परिणाम होऊन जागतिक मंदी येईल, असा इशारा महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिला आहे. 

नवी दिल्ली -जगभर फैलाव झालेल्या कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे. याचा परिणाम होऊन जागतिक मंदी येईल, असा इशारा महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिला आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महिंद्रा यांनी कोरोना विषाणू आणि त्यानंतर येऊ घातलेल्या संकटावर ट्विटरवर मते मांडली आहेत. त्यांनी म्हटले आहे, की कोरोनावर मात होईल, मात्र यामुळे जागतिक मंदी येईल. याचा सर्वाधिक फटका छोटे व्यवसाय, स्वयंरोजगार आणि रोजंदारी कामगारांवर होईल. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होण्यासोबत रोजगार जाणे, बेघर होणे आदी ताणतणावांमुळे मृत्यू वाढतील. याशिवाय नागरी अशांतताही निर्माण होऊ शकेल. 

या परिस्थितीत धडा घेण्यासारखे उदाहरण म्हणजे दुसरे महायुद्ध हेच आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर विविध देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी योजना राबवल्या तशाच आताही राबवण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global recession

टॅग्स