
मुंबई: गो एअरलाईन्स'ने (Go Air) ३,६०० कोटी रुपयांचा IPO लाँच (IPO papers) करण्यासाठी सेबीमध्ये (SEBI) आज कागदपत्र सादर केली. सेबीकडून शेअर बाजाराचे नियमन केले जाते. गो एअरलाईन्स ही वाडिया ग्रुपच्या मालकीची कंपनी आहेत. शेअर्सच्या माध्यमातून १५०० कोटी रुपये त्यांना उभे करायचे आहेत. (Go Air files IPO papers with SEBI for Rs 3,600-cr issue)
'गो एअरलाईन्स' ही लो कॉस्ट म्हणजे कमी खर्चात हवाई प्रवास घडवणारी कंपनी आहे. 'गो एअरलाईन्स'ने काल १३ मे रोजी कंपनी लिस्टिंग एक्ससाइज अंतर्गत आपलं नाव बदलून Go First केलं आहे.
या आयपीओमधुन उभ्या राहणाऱ्या रक्कमेचा कंपनी कर्जपरतफेडीसाठी आणि विमानांच्या देखभालीसाठी खर्च करणार आहे. विमानांसाठी इंधन पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचीही देणी चुकवली जातील.
कॅपा रिपोर्ट्नुसार, गो एअरलाईन्स ही भारतातील वेगाने प्रगती करणारी हवाई कंपनी आहे. वित्तीय वर्ष २०१८ मध्ये गो एअरलाइन्सचा देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा ८.८ टक्के होता आणि २०२० मध्ये हाच वाटा १०.८ टक्के आहे.
'गो फर्स्ट' नवीन झेप घेण्यासाठी सज्ज
गो एअर कंपनी नवीन झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. गो एअरने आता 'गो फर्स्ट' म्हणून नवीन नाव धारण केलं आहे. सध्याच्या कोरोना काळात जगभरातील हवाई कंपन्यांना फटका बसला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'गो फर्स्ट' ची विस्ताराची एक नवीन योजना आहे. कालच कंपनीने वृत्तपत्रात जाहीरात देऊन 'गो फर्स्ट' हे नवीन नाव धारण केल्याची माहिती दिली.
- वर्ष २०२० मध्ये गो एअर लाईन्सच्या विमानाचा सर्वाधिक वापर झाला. प्रतिदिन १२.९ तास या विमानांचा वापर झाला. त्यांच्यावर ८८.९ टक्के लोड होता.
- ३१ जानेवारी २०२० पर्यंत गो एअरने २८ देशांतर्गत आणि ९ आंतरराष्ट्रीय मार्ग कव्हर केले. भारतातील महत्त्वाची शहरे आणि परदेशात गो एअरचे जाळे विस्तारले आहे.
- अहमदाबाद, बागडोगरा, बंगळुरु, भुवनेशअवर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, इंदोर आणि इत्यादी शहरांमध्ये गो एअरची कार्यालये आहेत.
- 'गो एअरलाईन्स'ने २००५ साली ५० विमानांच्या ताफ्यासोबत व्यवसायाची सुरुवात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.