सोन्याची मागणी घटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - भारतातील सोन्याची मागणी एप्रिल ते जून या तिमाहीत ८ टक्‍क्‍यांनी कमी होऊन १८७.२ टनांवर आली आहे. मागील वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत मागणी कमी होण्यास अधिक महिना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले भाव कारणीभूत ठरले आहेत, अशी माहिती जागतिक सोने परिषदेने (डब्लूजीसी) दिली आहे. 

‘डब्लूजीसी’च्या अहवालानुसार, मागील वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी २०२.६ टन होती. याचे मूल्य ५२ हजार ७५० कोटी रुपये होते. चालू वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीत हे मूल्य ५२ हजार ६९२ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते जून तिमाहीत दागिन्यांची मागणी ८ टक्‍क्‍यांनी कमी होऊन १४७.९ टनांवर आली आहे. मागील वर्षातील याच तिमाहीत ती १६१ टन होती.

अक्षय तृतीया आणि विवाह मुहूर्तांमुळे एप्रिल ते जून या तिमाहीत सुरवातीला सोन्याची मागणी वाढली. मात्र, नंतर अधिक महिना सुरू झाला. हा महिना अशुभ मानला जात असल्याने आणि सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्याने मागणी कमी झाली. 
- सोमसुंदरम, व्यवस्थापकीय संचालक, डब्लूजीसी (इंडिया)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: god demand decrease

टॅग्स