वंचितांना 'गोदरेज' कंपनीने केले प्रशिक्षित, तर ३५ लाख लोकांना आरोग्यसेवा

nadir godrej
nadir godrejsakal media

मुंबई : गोदरेज इंडस्‍ट्रीज अॅण्‍ड असोसिएट कंपनीने (Godrej company) आपल्या दहा वर्षांच्या समाजाभिमुख (social work) व हरित प्रवासात पर्यावरण जपणूक, 35 लाख लोकांना आरोग्यसेवा (health facilities) तसेच पाच लाख वंचितांना व्यवसाय शिक्षण (business education) देणे ही उद्दीष्ठे गाठली आहेत.

जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे तसेच पर्यावरणपूरक हरित विश्व निर्माण करणे हे हेतू समोर ठेऊन गोदरेज समूहाचे काम सुरु आहे. या प्रवासात पाच लाखांहून जास्त वंचितांना उत्पन्न वाढविण्यासाठी यशस्वी प्रशिक्षण दिले तर पस्तीस लाख लोकांचे आजारांपासून रक्षण केले. आधी केले मग सांगितले या म्हणीनुसार स्वच्छ पर्यावरणासाठी गोदरेजचा देखील मोठा हातभार आहे. गोदरेज कंपन्‍यांमध्‍ये वापरली जाणारी अर्ध्‍याहून अधिक ऊर्जा ही स्वच्छ स्रोतांमधून आली आहे.

nadir godrej
धारावीने करुन दाखवलं ; चौथ्यांदा कोरोनाच्या शून्य रुग्णांची नोंद

गोदरेजकडून निर्माण होणा-या प्रत्‍येक टन उत्‍पादनामागे 30 टक्‍के कमी ऊर्जा व 35 टक्‍के कमी पाणी वापरले जाते. कर्बवायूंचे उत्सर्जनही निम्मे कमी होते, तसेच साधनसंपत्तीचा अपव्यवही 75 टक्के कमी झाला आहे, असे गोदरेज इंडस्‍ट्रीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक आणि गोदरेज अॅग्रोवेटचे अध्‍यक्ष नादिर गोदरेज म्‍हणाले. केवळ व्‍यवसाय न करता हरित भारत निर्माण करण्‍यावर आमचा भर आहे.

यापुढे आम्ही आणखी मोठे लक्ष्य ठेऊन हरित भारताचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी गोदरेज ने काही संस्थांशी सहकार्य करारही केला आहे. पुढील पाच वर्षांत दीड लाख लोकांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा तसेच एक कोटी नागरिकांचे आजारांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न राहील. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासोबतच भारतातील आठ महापालिकांना कचरा व्यवस्थापन यंत्रणा उपलब्धकरून देत आहे. त्याचा फायदा एक कोटी नागरिकांना होईल. तसेच गोदरेजची उत्पादनेही आतापेक्षा तिपटीने पर्यावरणपूरक असतील, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com