esakal | Gold Prices: सोने, चांदीच्या दरात बाजारात पुन्हा उसळी
sakal

बोलून बातमी शोधा

increase rate in gold and silver

मागील सत्रातील मोठ्या नुकसानीनंतर भारतीय बाजारपेठेत आज सोने, चांदीचे दर वाढले आहेत.

Gold Prices: सोने, चांदीच्या दरात बाजारात पुन्हा उसळी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील सत्रातील मोठ्या नुकसानीनंतर भारतीय बाजारपेठेत आज सोने, चांदीचे दर वाढले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 0.8 टक्क्यांनी वाढून 51 हजार 226 रुपये झाले आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 1.2 टक्क्यांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो 62 हजार 56 रुपयांपर्यंत गेली आहे. मागील सत्रात सोन्याच्या दर तब्बल 800 रुपयांनी घसरले होते. तर चांदी प्रतिकिलोला 1400 रुपयांनी घसरली होती. 

जागतिक बाजारपेठेतील किंमत-
अमेरिकी निवडणुकीच्या निकालापूर्वी स्पॉट सोन्याच्या किंमतीत किंचित बदल झाल्याचे दिसले आहे. यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोनेचे दर प्रति औंस 1904.66 डॉलर होता. तर चांदी 0.3 टक्क्यांनी वाढून 23.98 डॉलरवर पोहोचली आहे. मागील सत्रात डॉलरचा निर्देशांक 0.02 टक्क्यांनी घसरला होता.

स्टेट बँकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत वाढ

2020 मध्ये सोन्याचे दर 30 टक्क्यांनी वाढले-
भारतात 2020 मध्ये जागतिक पातळीनुसार सोन्याच्या किंमती तब्बल 30  टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने 56 हजार 200 विक्रमी उच्चांक गाठला होता. तर चांदी प्रति किलो 80 हजार रुपयांच्या जवळपास गेली होती. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

सोन्याची मागणी 30 टक्क्यांनी कमी: WGC
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) अहवालानुसार, कोरोनामुळे सोने, चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. या वाढलेल्या किंमतींमुळे सप्टेंबर तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 30 टक्क्यांनी घसरून 86.6 टन झाली होती. मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत सोन्याची एकूण मागणी 123.9 टन होती. 

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top