esakal | मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!
sakal

बोलून बातमी शोधा

MARUTI SUZUKI CARS.

 देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियासाठी (MSI) 2020 चा ऑक्टोबर महिना चांगला गेला आहे.

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियासाठी (MSI) 2020 चा ऑक्टोबर महिना चांगला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील कंपनीच्या कारच्या विक्रींचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी तर सप्टेंबरच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच दिवाळीच्या तोंडावर कंपनीच्या कारचे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मारुती सुझुकीची ऑक्टोबर महिन्यात 18.9 टक्क्यांनी विक्री वाढून 1,82,448 यूनिट्सवर पोहचली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,53,435 गाड्या विकल्या होत्या. तर सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या 1,52,608 गाड्या विकल्या गेल्या आहेत.

ITR भरण्याची मुदत वाढली, पण चुकूनही करु नका उशीर नाहीतर...

कंपनीकडून जाहीर केलेल्या निवेदनात भारतीय बाजारपेठेत 19.8 टक्क्यांची वाढ होऊन 1,72,862 यूनिट्सवर गेली आहे, जी ऑक्टोबर 2019 मध्ये 1,44,277 यूनिट्स होती. 

कंपनीच्या मिनी कारची ऑल्टो आणि एक्सोपोची विक्री ऑक्टोबरमध्ये 28,462 युनिटपर्यंत घसरली, जी वर्षभरापूर्वी याच महिन्यात 28,537 युनिटवर होती. कॉम्पॅक्ट सेगमेंट स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिजायरची विक्री 19.2 टक्क्यांनी वाढून 95,067 युनिटवर पोहोचली, जी ऑक्टोबर 2019 मध्ये 75094 युनिटवर होती.

अर्थव्यवस्था येतेय रुळावर; तब्बल 8 महिन्यांनंतर 1 लाख कोटींहून अधिक जीएसटी वसूल

ऑक्टोबरमध्ये सियाज मॉडेलची विक्री 40 टक्क्यांनी घसरून 1422 युनिट झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 2371 युनिटवर होती. तसेच कंपनीच्या विटारा ब्रेजा, एस-क्रॉस आणि एर्टिगा या युटिलिटी वाहनांची विक्रीत 9.9 टक्क्यांनी वाढ होऊन 23,108 युनिटवरून 25,396 युनिटवर पोहोचली. ऑक्टोबरमध्ये कंपनीची निर्यात 4.7 टक्क्यांनी वाढून 9586 युनिट झाली, ती वर्षभरापूर्वी याच महिन्यात 9158 युनिटवर आली.

(edited by- pramod sarawale)

loading image