
गुरुवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली होती. 10 ग्रॅम सोन्याचे दर 293 रुपयांनी कमी झाल्यानंतर सोन्याचा दर 49 हजार 72 रुपये झाला होता.
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 239 रुपयांनी तर 1 किलोग्रॅम चांदीच्या दरात 845 रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातील सोने आणि चांदीचे दर घसरले होते. मंगळवारी दिल्लीत सोन्याचे दर 10 ग्रॅमला 48 हजार 931 रुपये इतके होते. तर चांदीही 49 हजार 548 इतकी होती.
सोने 49 हजारांवर
गुरुवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली होती. 10 ग्रॅम सोन्याचे दर 293 रुपयांनी कमी झाल्यानंतर सोन्याचा दर 49 हजार 72 रुपये झाला होता. त्याआधी बुधवारी सोन्याचा भाव 49 हजार 365 इतका होता. किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे दर 48 हजार 819 रुपयांवरून 49 हजार 58 रुपयांवर पोहोचला.
चांंदीच्या दरात 845 रुपयांची वाढ
चांदीच्या दरातही शुक्रवारी वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफ बाजारात एक किलो चांदीचे दर तब्बल 845 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे एक किलो चांदीचा दर 48 हजार 455 वरून 49 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमती 17.81 डॉलर प्रति औंस झाली आहे.
हे वाचा - नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! पीएफवरील व्याजदर घटणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत सोमवारी एका महिन्यातील उच्चांकी किमतीवर पोहोचली होती. मंगळवारीही यामध्ये भाव वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात यावर्षी सोन्याच्या किंमती जवळपास 16 टक्के वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात साडेसात वर्षांतील उच्चांक मोडला होता.
एमसीएक्सवर सोन्याच्या ऑगस्ट महिन्यातील किंमतीतही घट होऊन ती 47881 झाली होती. यातील 14059 च्या लॉटचा व्यवहार झाला. सोन्याच्या ऑक्टोंबर महिन्यातील किंमतीतही तेवढीच घसरण झाल्याने 10 ग्रॅमचे दर 48028 इतके होते. यातील 5742 लॉटचे व्यवहार झाले.