
कोरोना लशीची चाचणी यशस्वी झाल्याच्या वृत्ताने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहे. सध्या सोन्याच्या दरात अस्थिरतेचे वातावरण राहण्याचे संकेत आहे.
नागपूर : ब्रिटेनमधील कोरोना विषाणूचे अधिक संसर्गजन्य असे नवे रूप आढळून आल्याने सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आठ दिवसांपासून शेअर बाजारासोबतच सोन्यातील गुंतवणूक वाढू लागली होती. त्यामुळे सोन्याचे दर वाढू लागले होते. मात्र, सोन्याच्या दरात चार दिवसांत ५०० रुपयांची तर चांदीतही १००० रुपयांची घसरण झाली आहे.
जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने भारतीय बाजारपेठेतही सोन्याचे दर घसरले आहे. सोमवारी सोन्याचा दर ५१ हजार १०० रुपये प्रति दहा ग्रॅम होतो त्यात मंगळवारी ५०० रुपयांनी घट होऊन ५० हजार ६०० रुपयांवर आले आहे.
कोरोना लशींच्या चाचण्या एकामागून एक यशस्वी होत आहेत. त्यामुळे भांडवली बाजारात तेजीची लाट आली होती. त्यामुळे आठ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर ५६ हजार ५०० रुपये दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव ६८ हजार रुपये किलोग्रॅम इतका झाला होता. सध्या सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
हेही वाचा - अचानक आला एकुलत्या एक मुलाच्या निधनाचा फोन; कुटुंबासह गावात पसरली शोककळा
कोरोना लशीची चाचणी यशस्वी झाल्याच्या वृत्ताने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहे. सध्या सोन्याच्या दरात अस्थिरतेचे वातावरण राहण्याचे संकेत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे