सोने-चांदीच्या दरात आजही वाढ; पाहा आजचे दर

Gold and silver rate increase today by 10rs
Gold and silver rate increase today by 10rs

भारतीय बाजारात आज सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. प्रतिदहा ग्रॅम केवळ दहा रुपयांची वाढ सोन्याचा दरात झालेली आज पाहायला मिळाली. काल बाजार बंद होताना गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर 51 हजार 450 रुपये होते जे आज 51 हजार 460 वर आले आहेत. तसेच चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 66 हजार 350 वरून 66 हजार 360 रुपयांवर गेले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

7 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतींनी भारतीय स्थानिक बाजारात प्रति दहा ग्रॅम 56200 रुपयांच्या उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या किंमती सतत खाली येत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अमेरिकन डॉलर मजबुत होऊ लागल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारासोबत भारतात सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. आतापर्यंतचा सोन्याच्या दरवाढीचा इतिहास पाहिला तर, सोने नेहमी जागतिक संकटाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वधारले होते.   

आज नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 49,120 रुपयांवर गेले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईत हा दर 50 हजार 450 रुपये होता. तसेच चेन्नईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 53,580 रुपये होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडवनीच्या शुल्कामुळे सोन्याचे दर दररोज बदलत असतात. सोने या धातूचा किमंतीबाबत दुसरा क्रमांक लागतो.

दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 252 रुपयांनी घसरून 52,155 रुपयांवर आल्या होत्या.चांदीचे दर प्रतिकिलो 462 रुपयांनी वाढून 68,492 रुपयांवर गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com