esakal | Gold silver rate: सोने, चांदीला आली पुन्हा झळाली; आताच खरेदी करा, कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

today gold and silver rate increases

मंगळवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत आज (बुधवार) सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसली आहे.

Gold silver rate: सोने, चांदीला आली पुन्हा झळाली; आताच खरेदी करा, कारण..

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मंगळवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत आज (बुधवार) सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणामुळे आणि रुपयाच्या घसरणीमुळे बुधवारी सोन्याचे भाव तब्बल 512 रुपयांनी वाढून 51 हजार 415 रुपये झाले. तर चांदीचे दर प्रति किलो 1448 रुपयांनी वाढून 64 हजार 15 रुपयांवर पोहचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही दर वाढून सोने प्रति औंस 1921 डॉलरपर्यं पोहोचले, तर चांदीच्या दरात किंचित वाढू दिसली आहे, आजचे चांदीचे दर 25.10 डॉलर प्रति औंस झाले आहे. 

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

नोव्हेंबर महिन्यात होत असणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुंकांचा परिणाम आतंरराष्ट्रीय कमॉडिटी मार्केटवर दिसत असल्याचे माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, दिल्लीत 24 कॅरट सोन्याची किंमत 512 रुपयांनी वाढली आहे. 

मंगळवारी सोने-चांदी दरात झाली होती घट-
सोने-चांदीच्या भावात मंगळवारी घसरण नोंदवण्यात आली होती. सोने 268 रुपयांनी घसरून 10 ग्रॅमला 50 हजार 860 रुपये आणि चांदी 1126 रुपयांनी घसरून 62 हजार 189 रुपये प्रति किलो झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1901 अमेरिकन डॉलर आणि चांदी 24.37 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत होते.

IRDAIने जारी केले health insuranceचे नवीन नियम; होतील अनेक फायदे

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-
दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(edited by- pramod sarawale)