कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 21 October 2020

सध्या Mutual Fundमध्ये कशी गुंतवणूक करायची हा प्रश्नही बऱ्याच जणांना सतावत असेल

नवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनाचा प्रभाव असल्याने जागतिक अर्थव्यवस्था मोठी नाजूक स्थितीत आहे. त्याचा परिणाम जागतिक भांडवली बाजारासोबतच भारतीय भांडवली बाजारावरही दिसत आहे. या काळात कमॉडिटी मार्केटमध्येही मोठी अस्थिरता दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर गेल्याचे दिसले होते. 

अशा काळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या काळात  Mutual Fundमध्ये कशी गुंतवणूक करायची हा प्रश्नही बऱ्याच जणांना सतावत असेल. त्यासाठीच काही उत्तम पर्याय खाली दिलेले आहेत. 

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून लागू होणार नवीन नियम

1. लिक्विड म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक केला तर फायदा होऊ शकतो-
सध्याच्या काळात लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते कारण ते कमी जोखमीचे फंड आहेत. इथली गुंतवणूक वेगवेगळ्या ठेवी, T-Bill, व्यावसायिक कागदपत्रे आणि मुदत ठेवींच्या प्रमाणपत्रात केली जाते. महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे पैसे 24 तासांच्या कालावधीत काढू शकता. काही एएमसीकडे ( AMCs) तरल निधीत त्वरित सुटका करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

2. SIPमध्ये गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर-
एसआयपी हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक आदर्श मार्ग आहे. अनेक एएमसी व्हिडिओ केवायसीचा पर्यायही यामध्ये देतात. अशा प्रकारे तुम्ही बँकेत न जाता गुंतवणूक सुरू करू शकता. पॅन कार्ड फोटो, आधार कार्ड ची प्रत अपलोड करुन आवश्यक गरजा पूर्ण करणे बंधनकारक आहे.

Gold prices: मागील 3 दिवसांत सोने दुसऱ्यांदा उतरले; जाणून घ्या आजची किंमत

2020 - 2021 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम एसआयपी (SIP) म्युच्युअल फंड-

1.Franklin India Feeder - Franklin U S Opportunities Fund
2.DSP BlackRock World Gold Fund
3.Aditya Birla Sun Life Digital India Fund
4.Nippon India US Equity Opportunites Fund
5.ICICI Prudential US Bluechip Equity Fund

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे कारण तुम्ही ते कमी किंमतीत विकत घेऊ शकाल. तज्ज्ञांच्या मते काही वेळातच बाजारपेठा पुन्हा सुरळीत होतील.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to invest in mutual funds during lockdown and corona