ब्रेकिंग : सोने, चांदीच्या भावात पुन्हा वाढ; पाहा आजचे दर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

प्रतिदहा ग्रॅमला 130 रुपयांनी वाढून 38 हजार 690 रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 900 रुपयांनी वधारून 47 हजार 990 रुपयांवर गेला.

नवी दिल्ली ः सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोने आणि चांदीच्या भावातील घसरणीचे वारे आज (ता.23) सोमवारी थांबले. दिल्लीत सोन्याच्या भावात 130 रुपये, तर चांदीच्या भावात 900 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. 

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीचे भाव वधारले. सोन्याचा भाव प्रतिऔंसला 1 हजार 518 डॉलरवर गेला, तर चांदीचा भाव प्रतिऔंस 17.87 डॉलरवर गेला. जागतिक पातळीवर भाव वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही सोने आणि चांदी वधारले.

दिल्लीतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 130 रुपयांनी वाढून 38 हजार 690 रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 900 रुपयांनी वधारून 47 हजार 990 रुपयांवर गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold ans silver prices today up