Gold Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 21 September 2020

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली होती. पण आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची नजर फेडरल रिझर्व्हच्या होणाऱ्या बैठकीवर आहे.

नवी दिल्ली: आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची नजर फेडरल रिझर्व्हच्या होणाऱ्या बैठकीवर आहे. यासोबतच डॉलरचे दरातही घट दिसून आली आहे. यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह कोणती पाऊले उचलते याकडे गुंतवणूकदारांची नजर असेल.

सध्या अमेरिकेत स्पॉट गोल्डच्या दरात 0.2 टक्क्यांनी वाढ होऊन 1953.37 डॉलर प्रति औंस झालं आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील वायदा बाजारातील सोन्याचे दर 0.1 टक्के वाढले आहेत. सध्या अमेरिकेतील वायदा बाजारात सोन्याचा दर 1960.50 डॉलर प्रति औंस आहे. सध्या डॉलरच्या किंमतीतही 0.1 टक्क्यांची घट दिसून आली आहे. यामुळे दुसऱ्या देशांचं चलन असणाऱ्यांना सध्या सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी आहे. 

अमेरिकेतील 'प्रोत्साहन पॅकेज'मुळं वाढू शकतात किंमती-
गुंतवणूकदारांचे फेड रिझर्व्ह कमिटीचे सदस्य आणि अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणांवरही लक्ष लागलं आहे. तज्ञांचे मते, जेरोम पॉवेल अमेरिकेला आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. सध्यपरिस्थितीत आर्थिक प्रोत्साहन जाहीर केलं तर ते डॉलरच्या किंमती उतरु शकतात. त्यामुळे डॉलरच्या किंमती उतरल्या तर गुंतवणूकदारांसाठी ती एक सकारात्मक गोष्ट असेल.

कोरोनामुळे जगातील बऱ्याच देशांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळं या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बरेच देश अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर करत आहेत. यामुळेच सोन्याच्या दरात आतापर्यंत 29 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

भारतातील सोन्याचे दर-

यादरम्यान भारतात बाजार बंद होताना दिल्ली सराफा बाजारात सोने 207 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले होते. यानंतर सोन्याचे भाव 52 हजार 672 रुपयांपर्यंत गेले होते. तर चांदीचे दरही 251 रुपयांनी वाढून 69 हजार 841 रुपयांवर गेलं होतं. 

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold becomes expensive on the first day of the week