Gold Loan: 'या' बॅंका देतात स्वस्त गोल्ड लोन! फक्त ही घ्या काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold loan
Gold Loan: 'या' बॅंका देतात स्वस्त गोल्ड लोन! फक्त ही घ्या काळजी

Gold Loan: 'या' बॅंका देतात स्वस्त गोल्ड लोन! फक्त ही घ्या काळजी

Cheapest Gold Loan: लोक विविध कारणांसाठी परवडेल तसे कर्ज घेत असतात. काहीवेळा अचानक पैसे हवे असतात. त्यावेळी काय करावं कळत नाही. अशावेळी तुम्ही बॅंकेतून गोल्ड लोन घेऊ शकता. गोल्ड लोन हा एक उत्तम पर्याय आहे. बॅंका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून सहज सोने कर्ज मिळू शकते. ते वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे. कमी जोखमीमुळे, बँका, एनबीएफसी किंवा इतर वित्तीय संस्थांकडून सोने गहाण ठेवून कर्ज सहजपणे घेतले जाऊ शकते. त्यामुळे काही बॅंकाच्या माध्यमातून तुम्ही गोल्ड लोन घेतल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

हेही वाचा: बायकोच्या नावाने उघडा Special Account! महिन्याला मिळतील ४५ हजार

या बॅंकेतून मिळेल स्वस्त गोल्ड लोन

- फेडरल बॅंक (Federal Bank) - 8.50 टक्के

-एसबीआय (SBI)- 7.30 टक्के

- पंजाब एंड सिंध बॅंक (Punjab & Sind Bank)- 7 टक्के

- पंजाब नॅशनल बॅंक (PNB)- 8.75 टक्के

-कॅनरा बॅंक (Canara Bank)- 7.35 टक्के

-इंडियन बॅंक (Indian Bank)- 7 टक्के

-बॅंक ऑफ बडोदा (BOB)- 9.00 टक्के

- कर्नाटक बैंक (Karnataka Bank)- 8.49 फीसदी

- आयडीबीआय बॅंक (IDBI)- 7 टक्के

- एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) - 11 टक्के

हेही वाचा: प्रसार भारतीमध्ये २५००० हून अधिक पदे रिक्त!

या चार गोष्टी लक्षात ठेवा

1) कर्ज घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुमचे सोने 18 कॅरेटपेक्षा कमी नसावे कारण अनेक बॅंका 18 कॅरेटपेक्षा कमी सोन्यावर कर्ज देत नाहीत.

2) गोल्ड लोन घेण्यासाठी आधार किंवा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. हे कार्ड तुमची ओळख म्हणून काम करेल.

3) सामान्य कर्जाप्रमाणे गोल्ड लोनही वेगवेगळ्या कालावधीसाठी दिले जाते. बॅंका ३ महिने ३६ महिन्यांपर्यंत सामान्य सोने कर्ज देत आहेत.

4) नेहमी सरकारी बॅंकाकडून गोल्ड लोन घेण्यासाठी प्रयत्न करावा. कारण इखे व्याजाचा दर कमी असतो.

(टीप: ही आकडेवारी ऑनलाइन मार्केटप्लेस BankBazaar.com द्वारे संकलित केली गेली आहे. या यादीमध्ये BSE वर सूचीबद्ध सार्वजनिक-खाजगी बँका आणि NBFC चा समावेश आहे.)

हेही वाचा: उशीरा लग्न केल्याने नात्यावर होतात ४ परिणाम

टॅग्स :BankgoldGold Loanloans