बायकोच्या नावाने उघडा Special Account! महिन्याला मिळतील ४५ हजार

एनपीएस ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे
Money for wife
Money for wife

तुमच्या बायकोने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असावे असे तुम्हाला वाटते का? ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असेल तर तुमच्या अनुपस्थितीतही तिच्याकडे नियमित उत्पन असले. त्यामुळे पैशांसाठी तिला इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. तुम्ही तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यासाठी तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme )गुंतवणूक करणे योग्य ठरेल. हे खाते तुमची बायको ६० वर्षांची झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. तसेच तिला महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळेल. तुम्ही ही रक्कम किती असावी तेही ठरवू शकता. त्यामुळे ६० नंतर ती कोणावरही आर्थिकदृष्टया अवलंबून राहणार नाही.

Money for wife
माठातून पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! आयुर्वेदानुसार महत्व वाचा!

अशी आहे योजना - तुम्ही नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खात्यात सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. तसेच तुम्हाला एक हजार रूपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या ६० व्या वर्षी मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार, बायकोचे वय ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत हवे असल्यास तुमचे NPS खाते सुरू राहू शकते.

Money for wife
चहा तोही फळांचा! चिकू, सफरचंद, केळी घातलेला चहा होतोय Viral

मिळणार ४५ हजारांपर्यंत मासिक उत्पन्न- जर तुमची बायको ३० वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा ५००० रुपये गुंतवत असाल. अशावेळी वार्षिक गुंतवणुकीवर १० टक्के परतावा मिळत असेल, तर वयाच्या साठीपर्यंत तिच्या खात्यात एकूण १.१२ कोटी रूपये जमा होतील. यातून तिला सुमारे ४५ लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे ४५ हजार रुपये पेन्शन मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे त्यांना हे पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.

Money for wife
घर बांधणं आणखी महागणार; काय आहे कारण? जाणून घ्या

असे मिळेल पेन्शन

वय- ३० वर्ष

एकूण गुंतवणूक कालावधी- ३० वर्षे

मासिक योगदान – ५ हजार

गुंतवणुकीवर अंदाजे परतावा - १० टक्के

एकूण पेन्शन फंड - १,११,९८,४७१ रूपये(रक्कम मुदतपूर्तीवर काढता येईल)

अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची रक्कम - ४४, ७९, ३८८ रूपये

अंदाजे वार्षिकी दर ८ टक्केप्रमाणे - ६७, १९, ०८३ रुपये

मासिक पेन्शन- ४४,७९३ रूपये

Money for wife
भारतातील पहिलं जोडपं ज्यांचं स्टार्टअप ठरलं 'युनिकॉर्न'

केंद्र सरकारची योजना - NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. तुम्ही या योजनेत गुंतवलेले पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केले जातात. केंद्र सरकार या व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना जबाबदारी देते. त्यामुळे तुमची एनपीएसमधील गुंतवणूक पूर्ण सुरक्षित आहे. या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर परतावा मिळण्याची खात्री नाही. वित्तीय नियोजकांच्या मते, एनपीएसने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com