सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले  

पीटीआय
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जागतिक पातळीवर भावात तेजी असूनही दिल्लीत सराफांकडून मागणी घटल्याने सोन्याची झळाळी कमी झाली. औद्योगिक क्षेत्र आणि नाण्यांची निर्मिती करणाऱ्यांकडून मागणी कमी झाल्याचा फटका चांदीला बसला.

नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 425 रुपयांची घसरण होऊन 37 हजार 945 रुपयांवर आला. जागतिक पातळीवर भावात तेजी असूनही दिल्लीत सराफांकडून मागणी घटल्याने सोन्याची झळाळी कमी झाली.

औद्योगिक क्षेत्र आणि नाण्यांची निर्मिती करणाऱ्यांकडून मागणी कमी झाल्याचा फटका चांदीला बसला. चांदीचा भाव आज प्रतिकिलो 690 रुपयांची घसरण होऊन 44 हजार 310 रुपयांवर आला. दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम 425 रुपयांची घसरण होऊन तो 37 हजार 945 रुपयांवर आला. स्टँडर्ड सोन्याच्या भावातही तेवढीच घसरण झाल्याने तो 37 हजार 775 रुपयांवर आला. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव वधारून प्रतिऔंस 1 हजार 509 डॉलरवर गेला तर चांदीचा भावही प्रतिऔंस 17.22 डॉलरवर गेला. 

मुंबईतही भावात घसरण 
मुंबईत आज शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 278 रुपयांची घट होऊन 37 हजार 670 रुपयांवर आला. याचबरोबर स्टँडर्ड सोन्याच्या भावात 277 रुपयांची घसरण होऊन तो 37 हजार 519 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रति किलोला 605 रुपयांनी कमी होऊन 43 हजार 675 रुपयांवर आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold loses sheen