नाशिकमध्ये सोनं 50 हजार पार! दिवाळीनंतर दरांची गगनभरारी | Gold rate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate

नाशिकमध्ये सोनं 50 हजार पार! दिवाळीनंतर दरांची गगनभरारी

नाशिक : पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती (gold rate) आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये सोन्याचा भाव 50 हजार पार पोहचला आहे. ऐन दिवाळीनंतर नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये (nashik gold association) सोन्याच्या दरांनी गगन भरारी घेतली आहे.

नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,

नाशिकच्या सराफा बाजारातील दर

(सोमवारी) 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 250 रुपये

22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले.

(बुधवारी) 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये

तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले,

तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले.

आज (गुरुवारी) सोन्याच्या दरांनी उसळी घेतली. त्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 50 हजार 900 रुपये नोंदवले,

तर 22 कॅरेट सोन्याचे दर 49500 रुपयांवर गेले.

चांदीचे दर किलोमागे 2 हजारांनी वाढून 69000 हजारांवर पोहचले

हेही वाचा: ST Strike: आज ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?

पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर दुप्पट

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा: 'गांधींच्या भिकेच्या कटोऱ्यातून मिळालं स्वातंत्र्य, जा आता रड'!

हॉलमार्क वस्तूंचा तपशील असणे आवश्यक

‘बीआयएस’च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे.

loading image
go to top