सोनं झालं 6 हजारांनी स्वस्त! आजही कमी होऊ शकतात किंमती

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 23 September 2020

जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे. अमेरिकन डॉलरही (US Dollar) चांगलाच वधारलेला दिसतोय. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) किमंतीवर दिसत आहे.

मंगळवार नंतर बुधवारीही सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसले आहेत. एमसीएक्सवर ऑक्टोबरमधील सोन्याचे वायदे बाजारातील दर प्रति 10 ग्रॅमला 0.4 टक्क्यांनी घसरून 50 हजार 180 हजार झालं आहे तर चांदीचे दर 1.6 टक्क्यांनी घसरून 60,250 रुपये प्रति किलो झाला आहे. जगभरात या आठवड्यात सर्व मौल्यवान धातूंचे दर मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. मागील सत्रात सोन्याचे दर 100 रुपयांनी घसरले होते, तर सोमवारी सोन्याचे भाव तब्बल 1,200 रुपयांनी कमी झाले होते. 

सावधान! OTP शिवाय खात्यातून काढले जातातय पैसे; तुम्ही अशी घ्या काळजी

सोने झाले 6 हजारांनी स्वस्त -
सोन्याच्या किंमती मागील महिन्याच्या तुलनेत विक्रमी 6 हजार  प्रति दहा ग्रॅम रुपयांनी खाली आहेत. 7 ऑगस्ट महिन्यात एमसीएक्सवरील सोन्याचे दर दहा ग्रॅम 56 हजार रुपयांच्या वर गेले होते. त्याच वेळी सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला 56 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचले होते. आता सोन्याचे दर 51 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आले आहेत. तसेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 5000 रुपयांनी स्वस्त झाले होते. 

SBI ने ग्राहकांना दिली महत्त्वाची माहिती, 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम

परदेशी बाजारातही सोनं स्वस्त :
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. आज, सोन्याच्या स्पॉट किंमतीही प्रति औंस 1900 डॉलरपर्यंत खाली आलं आहे.

सोन्याच्या किंमतींमध्ये घट कशामुळे?
सध्या अमेरिकन डॉलरमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक मागील आठ आठवड्यांच्या शिखरावर पोहोचला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक खरेदी करण्यास सुरवात केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घट दिसून येतेय.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices decreased six thousand rupees from last month