ऐन महागाईत सोनं स्वस्त, आताच तपासा तोळ्याचा भाव

ऐन महागाईत सोनं स्वस्त, आताच तपासा तोळ्याचा भाव

Gold Rate Today : आर्थिक वर्षाच्या अखेरीसही सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चकटे बसत आहेत. अशा परिस्थितीत मागील पाच दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी भारतीय बाजरपेठ उघडल्यानंतर सुरुवातीला सोन्याची झळाळी मिळाली. मात्र, दोन तासानंतर सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळाली.  दिवसाखेर मॅक्सवर (Multi Commodity Exchange)  सोन्याच्या किंमतीमध्ये ०.३ टक्के घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर सोन्याची किंमत प्रति तोळा ४४ हजार ३०० रुपये इतकी झाली. तर चांदीच्या किंमत ०.८ टक्केंची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीसह बुधवारी चांदीची किंमत प्रति किलो ६२ हजार ६१७ रुपये इतकी झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीमध्ये ०.५ टक्के आणि चांदीच्या किंमतीमध्ये १.७ टक्के कपात झाली होती.  

good returns च्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी २२ कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रतितोळा ६४० रुपयांनी घसरुन ४३ हजार ६३० इतकी झाली आहे. तर २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत ४४ हजार ६३० इतकी झाली आहे.  पाहा देशातील महत्वाच्या शहरातील सोन्याचे भाव...

शहराचं नाव 22-k gold (per 10 gm) 24-k gold (per 10 gm)
पुणे 43,620 44,620
केरळ 41,350 45,110
अहमदाबाद 43,850 45,690
भुवनेश्वर 41,350 45,110
जयपूर 43,500 47,450
पाटना 43,620 44,620
चंदीगढ 43,500 47,450

जानेवारीपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या वर्षभरात सोन्याच्या किंमतीत तब्बल पाच हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. कारण, गेल्या ११ महिन्यातील सोन्याची ही सर्वात निचांकी किंमत आहे. तसेच पुढील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तण्यात आली आहे.  

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याची किंमत उच्चांकी प्रति तोळा ५७ हजार रुपयांपर्यंतच्या पोहचली होती. तेव्हापासून आजपर्यंत प्रति तोळा सोन्याच्या किंमतीमध्ये १२ हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सर्वात चांगली संधी आहे.  

सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी घसरण?
तज्ज्ञांच्या रिपोर्ट्सनुसार सोन्याच्या किंमतीमध्ये सुरु असलेली घसरण लवकरच थांबू शकते. डॉलर आणि कच्च्या तेलाची घसरलेली किंमत यामुळे सध्या सोन्याची किंमत घसरली आहे. मात्र, लवकरच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं, इंधन आणि डॉलरच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. (हेही वाचा : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी)

४८ हजारांपर्यंत जाणार सोनं?
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या अंदाजानुसार, पुढील दोन महिन्यात सोन्याची किंमत प्रतितोळा ४८ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदी ७२ हजारांपर्यंत पोहचू शकतं.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com