सोन्याची झळाळी उतरली 

पीटीआय
मंगळवार, 14 जानेवारी 2020

जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची झळाळी सोमवारी कमी झाली. दिल्लीत सोन्याचा भाव २३६ रुपयांनी, तर चांदीचा भाव ३७६ रुपयांनी कमी झाला. 

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची झळाळी सोमवारी कमी झाली. दिल्लीत सोन्याचा भाव २३६ रुपयांनी, तर चांदीचा भाव ३७६ रुपयांनी कमी झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष काही प्रमाणात निवळला असून, यामुळे भू-राजकीय तणाव वाढण्याची शक्‍यताही कमी झाली आहे. आता जागतिक बाजारपेठेचे लक्ष अमेरिका-चीन व्यापार कराराकडे लागले आहे. यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांकडून सोने विक्रीचा मारा सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ५५० डॉलरवर आला, तर चांदीचा भाव प्रतिऔंसला १७.९७ डॉलरवर आला. जागतिक पातळीवरील विक्रीचा दबाव आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे दिल्लीत सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. येथील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहाग्रॅमला २३६ रुपयांची घसरण होऊन ४० हजार ४३२ रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे ३७६ रुपयांची घट होऊन ४७ हजार ६३५ रुपयांवर आला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी दिली.

मुंबईमध्ये भावात किरकोळ घसरण 
मुंबईतील सराफा बाजारातही आज सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली, तर चांदीचा भाव वधारला. सोन्याचा भाव प्रतिदहाग्रॅमला तीन रुपयांची घसरण होऊन ३९ हजार ७५७ रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे ८५ रुपयांनी वधारून ४६ हजार २६५ रुपयांवर बंद झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices fall today