esakal | आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं
sakal

बोलून बातमी शोधा

gold and silver rate

यूएस फेडरल रिझर्वने  (US Federal Reserve) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा परिणाम शेअर बाजारासोबत सोन्याच्या किंमतीवर होत आहे. याचाच एक भाग म्हणजे परदेशी बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे. सोन्याच्या किंमतीत आजही मोठ्या प्रमाणात चढउतार दिसू शकतात.

आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: यूएस फेडरल रिझर्वने  (US Federal Reserve) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा परिणाम शेअर बाजारासोबत सोन्याच्या किंमतीवर होत आहे. याचाच एक भाग म्हणजे परदेशी बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे. सोन्याच्या किंमतीत आजही मोठ्या प्रमाणात चढउतार दिसू शकतात.

बुधवारी स्पॉट मार्केटमध्ये (Spot market) सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या होत्या. मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावात (Gold Price)  चांगलीच तेजी दिसून आली होती. मंगळवारी झालेल्या वाढीमुळे सोन्याचा भाव आज 53 हजार प्रति 10 ग्रॅम आणि चांदी प्रतिकिलो  70 हजारांच्या जवळपास राहिली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत 137 रुपयांनी घसरून 53,030 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती आणि मंगळवारी सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 53,167 रुपयांवर बंद झाले होते.

corona updates: मागील 24 तासांत देशात कोरोनाचा कहर; उच्चांकी रुग्णवाढ

 चांदीचे नवीन दर (14 सप्टेंबर 2020 रोजी चांदीची किंमत) - चांदीही 517 रुपयांनी घसरून 70,553 रुपये प्रतिकिलोवर आली होती.  मंगळवारी चांदीचा दर प्रति किलो 71,070 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याचा भाव प्रति औंस 1,967.7 डॉलरवर होता. तर चांदीचा भाव औंस 27.40 डॉलर होता. 

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस; पुतीन, केपी ओली यांच्यासह राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा

 दुसरीकडे, वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्याच्या दिसून आल्या आहेत. परदेशी बाजारात झालेल्या बदलांमुळे बुधवारी वायदा व्यापारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे भाव 153 किंवा 0.30 टक्क्यांनी वाढून 51 हजार 922 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.