esakal | सोन्याने गाठली आतापर्यंतची उच्चांक पातळी; चांदीलाही लकाकी!
sakal

बोलून बातमी शोधा

Gold, Gold Price, Silver

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने उसळी घेतली आहे. तर चांदीचे भावसुद्धा कडाडले आहेत. चांदीचा दर 3 टक्क्यांनी वधारून 48,053 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे.

सोन्याने गाठली आतापर्यंतची उच्चांक पातळी; चांदीलाही लकाकी!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात आज मोठी वाढ होत सोने नव्या उच्चांकीवर पोचले आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या भावात ०.७ टक्क्यांनी वाढ झाली असून सोन्याचा दर 47,700 रुपये प्रति १० ग्रॅमवर पोचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने उसळी घेतली आहे. तर चांदीचे भावसुद्धा कडाडले आहेत. चांदीचा दर 3 टक्क्यांनी वधारून 48,053 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. भारतातील सोन्याच्या भावात 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी कराचा समावेश असतो. 

बाप रे! चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची गाडी 2021 मध्ये रुळावर येईल आणि तेसुद्धा कोविड-19च्या लस उपलब्ध होण्यावर अवलंबून असेल अशी चेतावनी दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने सात वर्षांची उच्चांकी पातळी गाठली. आज स्पॉट गोल्डच्या भावात 1 टक्क्यांची वाढ होत ते 1,759.98 डॉलरवर पोचले. ऑक्टोबर 2012 नंतरची ही उच्चांकी पातळी आहे. 

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण... 

इतर मौल्यवान धातूंमध्ये प्लॅटिनमच्या किंमतीत 0.7 टक्क्यांची वाढ होत त्याच्या किंमती 803.19 डॉलरवर पोचल्या आहेत. तर चांदीच्या भावात 2 टक्क्यांची वाढ होत ते 1696 डॉलरवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यावर्षी सोन्याच्या भावात 16 टक्के वाढ झाली आहे. आधीच मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्था कोविड-19 महामारीमुळे अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अनेक देशांच्या सरकारांनी आणि शिखर बॅंकांनी विविध आर्थिक पॅकजेची घोषणा केली आहे. अमेरिकेतील रिटेल विक्रीत आणि कारखान्यातील उत्पादनाने एप्रिलमध्ये मोठी घसरण नोंदवली आहे. अमेरिेकेतील व्याजदरात मोठी घसरण होत ते उणे होतील अशा अंदाजांमुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक उच्चांकीवर पोचली आहे.

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक

महागाई आणि चलनवाढ यासंदर्भात सोने हा सुरक्षित पर्याय म्हणून बघितला जातो. याशिवाय आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात सोने हा गुंतवणूकीचा आणि पैसा साठवण्याचा सुरक्षित पर्याय म्हणून वापरला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-19 महामारीच्या संदर्भात चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणमि चीनमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ होते आहे.

loading image