सोने महागले; पाच वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

नवी दिल्ली: सोन्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले आहेत. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव पाच वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदरात कपात होणार असल्याचे संकेत दिले आहे. जगातील पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने भारतीय बाजारात देखील आता सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गुंतवणूकदार आता सोन्याकडे मोर्चा वळवत आहे. 

 भारतीय बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 33 हजार 774 रुपयांवर पोचला आहे. त्यात 695 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,387 डॉलर्स प्रति औंस झाला आहे.  अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र येत्या काळात व्याजदरात घसरण होण्याची शक्यता आहे. परिणामी सोन्याची मागणी अचानक वाढली आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 34 हजार ते  34 हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. 

चांदीला देखील भाव: 
सोन्याबरोबरच चांदीच्या भावात देखील वाढ झाली असून प्रतिकिलो 751 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी आता प्रतिकिलो 38 हजार 055 रुपयांवर व्यवहार करते आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices jump to more than 5-year high