सोन्याच्या भावात किंचित घसरण; पुण्यात सोने 38 हजारांवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज (मंगळवार) पुन्हा भावात घसरण झाली आहे

पुणे: सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज (मंगळवार) पुन्हा भावात घसरण झाली आहे. काल सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 800 रुपयांनी वाढून 36 हजार 970 रुपयांवर पोचला होता. तर मुंबईत सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढून 36 हजार 310 रुपयांवर गेला. तर आज पुण्यात  सोन्याचा भाव 38 हजार 800 रुपये आहे.

आज एमसीएक्सवर ऑक्टोबर गोल्ड फ्युचरचे दर दहा ग्रॅमला 154 रुपयांनी घसरून ₹37 हजार 191 रुपयांवर आले आहे. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] मात्र जागतिक पातळीवर अमेरिका -चीन व्यापारयुद्धाचा भडका उडण्याच्या शक्‍यतेने गुंतवणूकदारांचा ओढा पुन्हा सोन्याकडे वळवण्याची शक्यता आहे. अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव वाढल्यामुळे सोन्याचा भाव मे 2013 नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे. स्थानिक सराफांकडूनही सोन्याला मागणी वाढल्याचाही परिणाम भावावर झाला. 

अमेरिकेने चीनच्या 300 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क आकारले आहे. हे शुल्क 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या खरेदीवर भर दिला जात आहे. यामुळे सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेतर रुपयात झालेली मोठी घसरणही भाववाढीस कारणीभूत ठरली. 

सोन्याचा भाव (पुणे) 

  • प्रति ग्रॅम ः 3880 (24 कॅरेट, 999)
  • प्रति ग्रॅम ः3770  (24 कॅरेट, 995)
  • प्रति ग्रॅम ः3618  (23 कॅरेट)
  • प्रति ग्रॅम ः3496  (22 कॅरेट)

चांदीचा भाव 

  • प्रति ग्रॅम  ः 43.50

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices slip today from record highs, silver follows suit