सोन्याच्या भावात चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण; चांदीच्या भावातही घसरण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

सराफा बाजारात सोन्याचा भाव 46 हजार 966 रुपयांवर पोचला आहे. चांदीच्या भावात ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारतातील सोन्याच्या भावात १२.५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीसएटी कराचा समावेश आहे.

देशातील सोन्याचा भावात आज घसरण नोंदवण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोन्यावर झाला आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात (एमसीएक्स) सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 46 हजार ४१६ रुपये झाला, त्यात ०.२५ टक्क्यांची घसरण झाली. तर सराफा बाजारात सोन्याचा भाव 46 हजार 966 रुपयांवर पोचला आहे. चांदीचा भाव प्रति किलो ४८ हजार ३१० रुपये झाला आहे. चांदीच्या भावात ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारतातील सोन्याच्या भावात १२.५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीसएटी कराचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याआधी या महिन्यात सोन्याच्या भावांनी उच्चांकी पातळी गाठली होती. सोने आतापर्यतच्या विक्रमी ४७,९८० रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावावर पोचले होते. त्यानंतर मात्र सोन्याच्या भावात चढउतार सुरू आहेत. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरणात आहे. प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार सुरू आहेत.  

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार सुरू आहे.  

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

* कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजी
* सोने आणि चांदीच्या भावात घसरण 
* नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

देशाच्या काही भागात सराफा दुकाने सुरू झाल्याची माहिती आहे. जवळपास दोन महिन्यांपासून सराफा दुकाने बंद होती. कोरोना संकटामुळे आणि उच्चांकी भावामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...

कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजी
सोन्याचा भाव साडेसात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता. अमेरिका-चीनमध्ये व्यापारी संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजीबरोबरच भावात चढउतार होत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इतर मौल्यवान धातूमध्ये प्लॅटिनमच्या भावात १.९ टक्क्यांची वाढ होत ते ८३४.१९ डॉलरवर पोचले आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या अर्थसत्तांमधील आर्थिक आकडेवारी, शिखर बॅंकांची धोरणे आणि पावले याशिवाय अमेरिका-चीनमधील तणाव यांचा परिणाम अमेरिकन डॉलर आणि सर्वसाधारण जोखमीवर आणि पर्यायाने सोन्याच्या भावावर होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices today fall for third day; Silver prices also fell