
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. युरोपामधील काही देशांमध्ये पुन्हा टाळेबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. युरोपामध्ये टाळेबंदी झाल्यास सोने-चांदीच्या दराचा आलेख चढेल असे संकेत तज्ज्ञांनी दिलेले आहेत.
सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे
नागपूर : नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. सोन्यांच्या दरही ५२ हजारांच्या आसपास असल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. अनलॉकमध्ये लग्न सोहळ्यांना परवानगी मिळू लागली आहे. त्यामुळे वधू-वर पक्षांना लग्नासाठी दागिने खरेदीचे वेध लागल्याने ग्राहकांची पावले दुकानाकडे वळू लागले आहेत.
दसरा, दिवाळी आणि पुढील लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहक दिसू लागले आहेत. दरवर्षी नवरात्रीपासून सोन्याच्या मागणीला वाढ होत असते. यंदाही तोच ट्रेंड पाहायला मिळत असला तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या मागणीत २५ टक्के वाढ झालेली आहे.
जाणून घ्या - सावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशांचा पाऊस; अखेर पोलिसांनी बाहेर आणले सत्य
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. युरोपामधील काही देशांमध्ये पुन्हा टाळेबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. युरोपामध्ये टाळेबंदी झाल्यास सोने-चांदीच्या दराचा आलेख चढेल असे संकेत तज्ज्ञांनी दिलेले आहेत.
उन्हाळ्यात थांबलेले लग्न आणि डिसेंबरमध्ये होणारे लग्न असा लग्नाचा डबल धमाका लक्षात घेता सोन्याची मागणी वाढणार आहे. तसेच दर वाढतील अशी शक्यता आहे. दहा ग्रॅमवर गेलेले सोने ५१ हजारांच्यावर स्थिरावले असून, चांदी प्रति किलो ६२ हजारांवर आहे. सोने ६० हजाराचा आकडा पार करेल असेही बोलले जात आहे.
सविस्तर वाचा - इट्स रिअली नाईस... बांबू राईस!, मधुमेह, सांधेदुखी आदींपासून मिळेल आराम
सोन्याची मागणी वाढणार
नवरात्रोत्सवात सोन्याच्या खरेदीला वेग आला आहे. दसरा, दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहकांची गर्दी वाढून दागिन्यांच्या मागणीत वाढ होईल. डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्न समारंभानिमित्त सोन्याची मागणी वाढणार आहे.
- राजेश रोकडे,
संचालक रोकडे ज्वेलर्स
संपादन - नीलेश डाखोरे
Web Title: Gold Prices Will Hight
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..