esakal | Gold Rate: सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate.jpg

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर उच्चांक गाठत असल्याचं दिसलं. पण हा आठवडा सोने आणि चांदीसाठी खूप खराब जात आहे.

Gold Rate: सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर उच्चांक गाठत असल्याचं दिसलं. पण हा आठवडा सोने आणि चांदीसाठी खूप खराब जात आहे. वारंवार कमी होणारी सोन्याची किंमत याचे मुख्य कारण आहे. आज सकाळी सोन्याचे दर 52,675 रुपये प्रती 10 ग्रॅम झाले. काल सोन्याचा भाव बाजार बंद होताना 52,930 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. यामुळे सोन्याची किंमत 255 रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर घसरत आहेत. 

मोठी बातमी : भारतीयांचा यूके, अमेरिका, कॅनडा आणि युएईला प्रवास शक्य

कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली केली. लोकांमध्ये वाढणारी असुरक्षितता यामागचं कारण होतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव वाढत होते. या आठवड्यातील अपवाद वगळता सोन्याचे दर 2020 यावर्षी वाढतच गेले आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 57 हजारांच्या वर गेले होते. तिकडे आंतराष्ट्रीय बाजारातील दरही 2000 डॉलर प्रती औंसच्या वर गेले आहेत. 

चांदीची किमंतही आता 77 हजार पार करून 80 हजाराकडे चालली आहे. तज्ज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव आतापर्यंतचा उच्चांक गाठतील. तज्ज्ञांच्या मते भविष्यात जरी कोरोनावर औषध आले तरी सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागेल. त्यामुळे सोने भविष्यात 80 हजारांपर्यंत जाईल, असं काहींचं म्हणणं आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सोने नेहमी जागतिक अडचणींच्यावेळी वधारले होते. त्यामध्ये 1979 युद्धप्रसंग असेल अथवा 2014 सीरीया आणि अमेरिकेतील वाढलेला तणाव असो.

राजीव त्यागींच्या मृत्यूप्रकरणी सांबित पात्रा यांच्यासह एका वृत्तवाहिनीविरोधात...

दरम्यान, कोरोना महामारीने असामान्य परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनावर अजूनही प्रभावी आणि सुरक्षित उपाय मिळालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीती कायम आहे. अशा परिस्थितीत लोक नेहमीच सोन्याकडे धाव घेतात. लोक गुंतवणूक म्हणून नेहमीच सोन्याकडे पाहतात. कोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे हा आठवडा वगळता सोन्याचे भाव वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात घसरण दिसून आल्यास सोन्याचे भाव वाढतात, हे सर्वसाधारण चित्र दिसून येतं. किमान दोन वर्षे तरी सोने आणि चांदीचे भाव वाढत राहतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.