सणासुदीमुळे सोने झळाळले

पीटीआय
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर सराफा बाजारात मागणी वाढल्याने गुरुवारी सोने झळाळून निघाले. दिल्लीतील सराफा बाजारात सोने भाव प्रति दहा ग्रॅमला १२५ रुपयांनी वधारून ३२ हजार ६२५ रुपयांवर गेला. गेल्या सहा वर्षांतील सोन्याचा हा उच्चांकी दर आहे. मुंबईतही सोने ९५ रुपयांनी महागले. सोने दर प्रति दहा ग्रॅमला ३१ हजार ७७० रुपयांवर बंद झाले. 

जागतिक बाजारातील तेजीचे पडसाद सराफा बाजारावर उमटले आहेत.  दसऱ्यानंतर देशात उत्सवाचे वातावरण आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून मौल्यवान धातूची मागणी वाढल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणाने गुंतवणूकदारही सोन्याला पसती देत आहेत. दिल्लीत शुद्ध सोन्याचा भाव १२५ रुपयांनी वधारून ३२ हजार ६२५ रुपयांवर बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात वाढ झाली. मुंबईत शुद्ध सोने ३१ हजार ९२० रुपये आणि स्टॅंडर्ड सोने ३१ हजार ७७० रुपयांवर बंद झाले. चांदीच्या दरात मात्र १३० रुपयांची घट झाली. चांदीचा भाव प्रतिकिलो ३९ हजार ६०० रुपयांवर बंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Rate Increase by Festival