६ महिन्यांत ६ हजारांनी सोन्याला झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

Gold : ६ महिन्यांत ६ हजारांनी सोन्याला झळाळी

पुणे - जगातील काही देशांत निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील केंद्रीय बँकांनी वाढविलेला सोन्याचा साठा, गुंतवणुकीचा चांगला पर्याय यामुळे झालेली खरेदी, या कारणांमुळे गेल्या काही दिवसांत सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत २४ कॅरेट सोन्याचे भाव सहा हजार ३०० रुपयांनी वाढले आहे. दरम्यानच्या काळात काहीवेळा भाव कमी-अधिक झाले आहेत.

एक ऑगस्ट २०२२ रोजी २४ कॅरेट सोन्याचे भाव ५१ हजार ३५० रुपये होते. एक फेब्रुवारी रोजी हा भाव ५७ हजार ६६९ रुपये झाला आहे. तर चांदीदेखील तेजीने वाढत आहे. याच काळात चांदी प्रतिकिलो ५७ हजार ७४२ वरून ६९ हजार ३६५ रुपयांवर पोचली आहे.

भाव वाढण्याची प्रमुख कारणे

  • आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील केंद्रीय बँकांनी वाढविलेला सोन्याचा साठा

  • रशिया-युक्रेनचे युद्धाचा जागतिक बाजारपेठांवर झालेला परिणाम

  • आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) या संस्थेद्वारे जागतिक आर्थिक दरवाढीत घट होण्याचे केलेले भाकीत

  • देशात वाढलेली सोन्याची मागणी

  • चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा भितीचे वातावरण

वर्षभर तेजी राहण्याची शक्यता

देशात सोन्याचे भाव काय असावेत हे आपण ठरवत नाहीत. आपण ठरलेले भाव स्वीकारतो. त्यामुळे आपण भावाबाबत काहीही करू शकत नाही. आपल्याकडे सोन्याला मोठी मागणी आहे. जगातील एकूण परिस्थितीचा विचार करता पुढील वर्षभर भाव तेजीत राहतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नऊ फेब्रुवारीचे भाव

५७,८१० - २४ कॅरेट सोने

५४,२४० - २२ कॅरेट सोने

६९,४०० - चांदी (एक किलो)

आर्थिक अनिश्चिततेमुळे आरबीआयसारख्या जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढविला आहे, तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा जागतिक बाजारपेठांवर झालेला परिणाम यांसारख्या काही कारणांमुळे सोन्याचे भाव वाढले आहेत. यापुढील काळातदेखील भाव तेजीत राहतील, असा अंदाज आहे. चांगला परतावा मिळत असल्याने नागरिकांची सोनेखरेदीला पसंती आहे.

- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

टॅग्स :Gold RateIndia