esakal | Gold Rate: सोन्याचे दर मागील चार दिवसांनंतर स्थिर; जाणून घ्या आजचे भाव
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate

 जेव्हांपासून देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे, तेव्हांपासून सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली होती. 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं.

Gold Rate: सोन्याचे दर मागील चार दिवसांनंतर स्थिर; जाणून घ्या आजचे भाव

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती (Gold price delhi bullion market) प्रति 10 ग्रॅम 324 रुपयांनी वाढून 50 हजार 824 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे गेल्या चार सत्रांमधील मौल्यवान धातूंच्या किमंतीच्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. गुरुवारी सोन्याच्या बाजर 50 हजार 500 प्रति 10 ग्रॅम रुपयांवर बंद झाला होता, एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल याबद्दल बोलताना म्हणाले, “दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 324 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव 50 हजार 824 वर गेले आहेत. मागील चार दिवसांपासून सोने बाजारातील घसरण यामुळे थांबली आहे." आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1883 डॉलर आणि चांदी 23.10 डॉलर प्रति औंस स्थिर राहिलं आहे. 

वायदा बाजारातही दिसून आली घट-
मागणी घटल्याने शुक्रवारी वायदा बाजारातील सोन्याच्या किंमती 0.2 टक्क्यांनी घसरून 49 हजार 806 रुपये झाल्या. तसेच न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.09 टक्क्यांनी घसरून 1,875.30 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

 Economic Crisis : आर्थिक संकट काही हटेना; रुपयाची घसरण सुरूच!

सोन्याचे वितरण घटले-
एमसीएक्समध्ये सोन्याच्या वितरणात घट दिसून येत आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हर होणारा सोन्याचा भाव 238 रुपयांनी घसरून 49 हजार 666 वर बंद झाला आहे. तसेच डिसेंबरच्या वितरणासाठीचे असलेले सोन्याचे दर 288 रुपयांनी घसरून 49 हजार 663 रुपयांबर वर बंद झाला. दुसऱ्याबाजूला फेब्रुवारी 2021 मधील वितरणासाठी असलेल्या सोन्याचे भाव वाढले आहेत. 44 रुपयांच्या किंचित वाढीसह ते 49 हजार 788 रुपयापर्यंत गेले आहेत. 

सोनं झालं 6 हजारांनी स्वस्त! आजही कमी होऊ शकतात किंमती

लॉकडाऊनमध्ये सोने-चांदी दरात मोठी चढउतार-
 जेव्हांपासून देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे, तेव्हांपासून सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली होती. 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या विविध टप्प्यात सोन्याच्या दरात चढउतार दिसला. याकाळात सोने आतापर्यंतचा सगळ्यात जास्त 56 हजार 200 रुपयांपर्यंत गेले होते.

(edited by- pramod sarawale)