Gold rate today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या भाव

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 18 January 2021

सोमवारी सोन्याच्या दरांमध्ये (Gold prices Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले

नवी दिल्ली- सोमवारी सोन्याच्या दरांमध्ये (Gold prices Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटीज एक्सेंजमध्ये (MCX) आज सकाळी सोने फेब्रुवारीच्या फ्यूचर ट्रेड 40 रुपयांच्या घसरणीसह 48,685.00 रुपयांवर आले आहे. याच्या उलट चांदीच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. मार्चमध्ये फ्यूचर ट्रेंड 260 रुपयांच्या तेजीसह  65,024.00 रुपयांच्या लेवलवर आले.  

देशाची राजधानी दिल्लीमध्ये 18 जानेवारीला गोल्ड रेट्स

22 कॅरेट गोल्ड - 48130 रुपये
24 कॅरेट गोल्ड - 51500 रुपये
चांदीचा रेट - 65000 रुपये

शेअर बाजार किती स्वस्त, किती महाग? 

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने चांदीचे रेट्स 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. आज अमेरिकेत सोने व्यवसायात 1.62 डॉलरची वाढ होत 1,828.99 डॉलर प्रति औंस लेवलवर आले. दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये 0.11 डॉलरची वाढ होत 24.48 डॉलरच्या लेवलवर स्थिर झाले.  

2020 मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. 2019 मध्येही सोन्याचे भाव वाढले होते आणि आता 2021 मध्येही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास आहे, पण 2021 मध्ये सोन्याला भाव येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 2021 वर्ष सोन्यासाठी चांगले राहिल. यावर्षी सोन्याची किंमत 63,000 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. 

‘यूपीआय’मधील गैरव्यवहार

सोन्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास आता चांगली संधी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याची किंमत 28 टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीने नवा रिकॉर्ड स्थापित केला होता आणि आपला ऑल टाईम हाय स्तर गाठला होता. भारतामध्येच सोन्याची किंमत वाढतेय असे नाही तर जगभरात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. यावर्षी जागतिक बाजारात सोने जवळजवळ 23 टक्क्यांनी वाढले. 2019 मध्ये सोन्याची दर वाढ डबल डिजिटमध्ये होती, 2021 मध्येही ती डबल डिजीटलमध्ये आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold rate today Gold prices Today MCX silver rate