esakal | Gold Rate Update | नवरात्रीआधी भाव घसरले, खरेदीसाठी 'सोन्या'ची वेळ?
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

Gold Rates |नवरात्रीआधी भाव घसरले, खरेदीसाठी 'सोन्या'ची वेळ?

sakal_logo
By
ओमकार वाबळे

Gold-Silver Price Update | ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. मात्र ही घसरण तात्पुरती असल्याचे विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. ११ दिवसांवर दसरा असल्याने भारतात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात.

तसेच डॉलर निर्देशांकातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या बाजारातील वाढीव दरांमुळे येत्या आठवड्यात सोन्याचे भाव वाढल्याचेही दिसू शकतात. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढू शकते. अशा स्थितीत सण आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने भाव वाढू शकतात.

मंगळवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये गोल्ड फ्युचर्समध्ये 0.25 टक्क्यांची घसरण झाली आणि सोनं 46,768 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होती. चांदीचा दर 0.54 घसरून 60,625 रुपये प्रति किलो झाला.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव पाहिल्यास दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,650 आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,800 आहे. मुंबईत 22 कॅरेट सोने 45,490 आणि 24 कॅरेट सोने 46,490 आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोने 46,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोने 48,700 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 43,050 आणि 24 कॅरेटची किंमत 48,060 रुपये आहे. हे दर 10 ग्रॅम सोन्याचे आहेत.

loading image
go to top