esakal | Gold Price | सणांमुळे सोन्याला झळाळी, भाव वधारले!
sakal

बोलून बातमी शोधा

gold price

सणांमुळे सोन्याला झळाळी, भाव वधारले!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

सणांचे दिवस सुरू झाल्याने देशातील सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय सराफा बाजारात आज (13 ऑक्टोबर) सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. तसेच चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घट झाली. त्यानंतर सोनं विक्रमी उच्चांकापासून 9059 रुपयांनी स्वस्त झालं. मात्र, आता सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स), आज डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किंमतीत 0.3 टक्के किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर चांदीचे भाव 0.39 टक्के वाढले आहेत.

काय आहे भाव?

सोन्याची किंमत आज 0.3 टक्क्यांनी वाढून 47,214 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याचबरोबर चांदी 0.39 टक्क्यांनी वाढली असून 61,826 रुपये आहे.

loading image
go to top