Gold-Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Check Today's Gold Silver Price Updates
Gold-Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात सतत चढउतार होत असतात. आज म्हणजेच 1 मे रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,400 आहे, काल ही किंमत 48,550 रुपये होती. म्हणजेच सोन्याच्या किंमतीत प्रतितोळा 150 रुपये घट झाली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,800 रुपये आहे. काल ही किंमत 52,960 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

चांदीच्या किंमतीत घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 63,500 आहे. ही किंमत काल 64,050 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.