Gold-Silver Price: सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं? जाणून घ्या आजचे दर

आज सोनं आणि चांदीचे भाव स्थिर आहेत.
Gold-Silver Price Today
Gold-Silver Price TodaySakal

Gold-Silver Price Today, 27th April 2022: सोने-चांदीच्या दरात चढउतार होत असतात. त्यानुसार सोन्या-चांदीच्या भावात बदल होत असतो. मात्र, आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,300 आहे, कालसुद्धा सोनं याच किमतीने विकलं जात होते.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 53,780 रुपये आहे. कालसुद्धा सोनं याच भावानं विकलं जात होता. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

Gold-Silver Price Today
Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीसाठी योग्य वेळ; जाणून घ्या आजचा भाव

चांदीच्या भावात घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,100 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 67,400 होती. म्हणजेच चांदीच्या दरात प्रतिकिलो 300 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold-Silver Price Today
Gold-Silver Price: सोनं महागलं, चांदी मात्र स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com