
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर
गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव वाढत होते. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक दिवस आहे. कारण आज देशातील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरला असून तो 49,300 रुपयांवरून 49,000 रुपयांवर आला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 330 रुपयांनी घसरून 53,450 रुपयांवर आली आहे.
हेही वाचा: Investment Tips: 100 रुपयांपासून सुरु करा SIP आणि मिळवा उत्तम परतावा
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या दरात घसरण झाल्याने लोकांसाठी हा मोठा दिलासा आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅमचे 22 कॅरेट सोने 49,000 रुपयांना आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार चेन्नई सारख्या दक्षिणेकडील शहरांमध्ये सोन्याच्या भावात वाढ होती.तिथे सोने 49,450 रुपयांवर होते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर करांमुळे देशभरात सोन्या-चांदीच्या किमती बदलतात.
हेही वाचा: Petrol-Diesel Price: सलग अठराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या आजची किंमत
जाणून घ्या तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याच्या किमती-
पुणे - 53,500
बंगलोर - 53,450
जयपूर - 53,600
नागपूर - 53,500
पाटणा - 53,500
अहमदाबाद - 49,530
लखनौ - 53,600 रु
म्हैसूर - 53,450
Web Title: Gold Update Todays Gold Rate 24 April
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..