Investment Tips: 100 रुपयांपासून सुरु करा SIP आणि मिळवा उत्तम परतावा

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक हा अतिशय चांगला पर्याय मानला जात आहे.
SIP Investment Tips
SIP Investment TipsSakal

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक हा अतिशय चांगला पर्याय मानला जात आहे. आजच्या काळात एसआयपी सुरु करणे खूप सोपे झाले आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केवायसी पूर्ण करून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. मार्च 2022 मध्ये एसआयपी गुंतवणूक सुमारे 12,328 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अगदी 100 पासूनही सुरुवात करू शकता. पण एसआयपी लाँग टर्मसाठी ठेवल्या तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो. कारण यात गुंतवणूकदारांना चक्रवाढीचे जबरदस्त 3 फायदे मिळतात. गेल्या पाच वर्षांत 100 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

SIP Investment Tips
LIC IPO ची लॉन्च तारीख पक्की; जाणून घेऊया सविस्तर माहिती

उत्तम परतावा देणाऱ्या SIP-

1) ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड (ICICI Prudential Technology Fund)-

5 वर्षांमध्ये वार्षिक परतावा - 31.85% CAGR

1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 3.98 लाख रुपये

10,000 मासिक SIP - 14.20 लाख

किमान गुंतवणूक - 5,000

किमान SIP - 100 रुपये

एसेट्स - 8,742 कोटी (31 मार्च 2022 पर्यंत)

एक्‍सपेंश रेश्‍यो - 0.71% (31 मार्च 2022 पर्यंत)

2) आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड (Aditya Birla Sun Life Digital India Fund)-

5 वर्षांमध्ये वार्षिक परतावा - 31.51% CAGR

1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 3.93 लाख रुपये

10,000 मासिक SIP चे मूल्य - 13.57 लाख रुपये

किमान गुंतवणूक - 1,000 रुपये

किमान SIP - 100 रुपये

ऍसेट - 8,742 कोटी (31 मार्च 2022 पर्यंत)

एक्सपेंस रेश्यो - 0.71% (31 मार्च 2022 पर्यंत)

SIP Investment Tips
सेन्को गोल्डचाही IPO येणार, 525 कोटी उभारण्याची योजना

3) निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)-

5 वर्षांमध्ये वार्षिक परतावा - 31.51% CAGR

1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 3.93 लाख रुपये

10,000 मासिक SIP चे मूल्य - 13.57 लाख रुपये

किमान गुंतवणूक - 1,000 रुपये

किमान SIP - 100 रुपये

ऍसेट - 8,742 कोटी (31 मार्च 2022 पर्यंत)

एक्सपेंस रेश्यो - 0.71% (31 मार्च 2022 पर्यंत)

4) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यूएस ब्लूचिप इक्विटी फंड (ICICI Prudential US Bluechip Equity Fund)-

5 वर्षांमध्ये वार्षिक परतावा - 18.15 टक्के CAGR

1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 2.30 लाख

10,000 मासिक SIP चे मूल्य - 9.32 लाख

किमान गुंतवणूक - 5,000 रुपये

किमान SIP – 100 रुपये

ऍसेट - 2,104 कोटी (31 मार्च 2022 पर्यंत)

एक्सपेंस रेश्यो - 1.08% (31 मार्च 2022 पर्यंत)

SIP Investment Tips
पुन्हा रजिस्ट्रेशन न केल्यास 1 एप्रिलपासून थांबू शकते तुमची SIP!

एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांची वाढती क्रेझ-

पद्धतशीरपणे किंवा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आणि दीर्घकाळासाठी सुरक्षित असल्याचे रिटेल गुंतवणुकदारांचे म्हणणे असल्याचे एडलवाइज म्युच्युअल फंडचे हेड (सेल्‍स) दीपक जैन यांनी म्हटले. त्यामुळे नियमित गुंतवणुकीसाठी ते SIP ला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड किंवा डायनॅमिक फंड एकरकमी गुंतवणुकीचा पर्याय निवडत नाहीत. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ परताव्यावर नसून एडजस्‍टेड रिटर्नवर आहे. यासाठी SIP हा उत्तम पर्याय आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com