सुवर्णसंधी: आता उरले अवघे 5 तास!

सुवर्णसंधी: आता उरले अवघे 5 तास!

पुणे: गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक या मार्गातून होऊ लागली.

दीर्घ मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक करण्याचा हा योग्य मार्ग अनेकांनी अंगीकारला. महागाई दरावर मात करून ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळवायचा असेल तर इक्विटी क्‍लासची कास धरणे गरजेचे ठरत आहे आणि याची जाणीव हळूहळू गुंतवणूकदारांना होऊ लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब म्युच्युअल फंडांकडे वाढत चाललेल्या गुंतवणुकीच्या आकड्यांतून दिसून येत आहे. यानिमित्ताने पारंपरिक गुंतवणूक प्रकारांकडून काहीशा नव्या गुंतवणूक प्रकाराकडे नागरिकांचा कल वाढत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

‘सकाळ मनी’चा प्रभावी उपक्रम
बदलत्या काळाची नेमकी हीच गरज ओळखून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आर्थिक समृद्धीसाठी एक चांगला गुंतवणूक प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. याचे पहिले पाऊल म्हणून (www.sakalmoney.com) या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सकाळ मनी’ने जनजागृतीपर सेमिनार घेण्यास सुरवात केली आहे. आता एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सहकार्याने आज ( २६ ऑक्‍टोबर) पुण्यात, तर कोल्हापूर व नाशिकमध्ये २ नोव्हेंबरला खास सेमिनारचे आयोजन केले जात आहे.

पुण्यातील सेमिनार
वार व तारीख - आज (शुक्रवार), २६ ऑक्‍टोबर २०१८
वेळ - सायंकाळी ५.३० वाजता 
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट, पुणे
प्रमुख वक्ते - प्रशांत जैन (कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी, एचडीएफसी एएमसी)
सेमिनारला येण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ७४४७४५०१२३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. मिस्ड कॉल दिल्यावर प्राप्त झालेल्या लिंकवर आपली माहिती भरल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल. 

प्रशांत जैन यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रातील प्रख्यात आणि नावाजलेले मान्यवर म्हणून त्यांना सर्व जण ओळखतात. ते स्वत: इक्विटी प्रकारातील तीन योजनांचे फंड मॅनेजर आहेत. एखाद्या फंडाचे व्यवस्थापन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी करीत त्यात १९ टक्के वार्षिक वृद्धिदराने परतावा मिळवून देण्याची त्यांची क्षमता वाखाणण्यासारखी आहे. ते बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्याआधी त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतून (आयआयटी) मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेली आहे. १९९१ ते ९३ या कालावधीत ते एसबीआय म्युच्युअल फंड; तसेच १९९३ ते २००३ दरम्यान झ्युरिच म्युच्युअल फंडात कार्यरत होते. २००३ मध्ये झ्युरिच म्युच्युअल फंडाचे संपादन एचडीएफसी म्युच्युअल फंडाने केल्यापासून ते एचडीएफसी म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com