esakal | बिटकॉइन पडणार सोन्यावर भारी ?  
sakal

बोलून बातमी शोधा

Bitcoin Sakal.jpg

वित्तीय पतमानांकन गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने बिटकॉइन या आभासी चलनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र सोन्याची चमक कायम राहणार असल्याचे गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने म्हटले आहे.

बिटकॉइन पडणार सोन्यावर भारी ?  

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वित्तीय संस्था गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने बिटकॉइन या आभासी चलनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र सोन्याची चमक कायम राहणार असल्याचे गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने म्हटले आहे. तसेच गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने केलेल्या नोंदीनुसार मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या कामगिरीमुळे काही गुंतवणूकदारांना बिटकॉइन सोन्याची जागा घेईल अशी चिंता वाटत आहे. मात्र बिटकॉइनच्या वाढत्या लोकप्रियतेचा सोन्याच्या अस्तित्वाला कोणताही धोका नसल्याचे या नोंदीत अधोरेखित करण्यात आले आहे. 

बिटकॉइनच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे बिटकॉइन सोन्यापेक्षा वरचढ होईल अशी चर्चा सुरु झाली होती. सुरवातीला जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने मुख्य प्रवाहातील वित्तीय क्षेत्रात क्रिप्टोकरन्सी लोकप्रियता सोन्याच्या किंमतीवर वाढत असल्याचे म्हटले होते. जेपी मॉर्गननुसार ऑक्टोबर महिन्यापासून क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइन मधील बरीच रक्कम गुंतवली गेली आहे. तर गुंतवणूकदारांनी सोन्यापासून फारकत घेतल्याचे जेपी मॉर्गनने म्हटले आहे. तसेच जास्तीत जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीकडे वळत असल्याने हा कल बराच काळ कायम राहण्याची शक्यता असल्याचे जेपी मॉर्गनने म्हणणे आहे. आणि त्यामुळेच मालमत्ता म्हणून क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

Gold Price - सोने-चांदीच्या दरात तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ

त्यानंतर आता गोल्डमॅन या संस्थेने संस्थात्मक गुंतवणूकदारांसह अन्य श्रीमंत गुंतवणूक करणारे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे टाळत असल्याचे म्हटले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये पारदर्शकता नसल्यामुळेच ते गुंतवणूक करत नाहीत. तसेच बिटकॉइनच्या वाढत्या लोकप्रियतेचा सोन्याच्या गुंतवणुकीवर कोणता परिणाम होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताच पुरावा नसल्याचे गोल्डमॅनने म्हटले आहे. मात्र सोने आणि बिटकॉइन एकत्र चालू शकते असे गोल्डमॅनने नमूद केले आहे. 

दरम्यान, यावर्षी बिटकॉईनची किंमत तीन पेक्षा अधिक पटीने वाढलेली आहे. तर सोन्याच्या किंमती 24 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याने 2075 डॉलर प्रति औंस अशी विक्रमी पातळी गाठली होती. मात्र त्यानंतर सोन्याला उतरत असल्याचेच दिसून आले आहे. याव्यतिरिक्त गुग्हेनहेम इन्व्हेस्टमेंट्सचे स्कॉट मिनार्ड यांनी बिटकॉइनची कमतरता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने भरमसाठ पैशाची छपाई केल्यामुळे बिटकॉईनची किंमत 4 लाख डॉलर्स पर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.                  

loading image