esakal | Gold Price - सोने-चांदीच्या दरात तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

gold rates today

सराफ बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी सोने - चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर घसरण सुरू झाली होती त्याला ब्रेक लागला आहे.

Gold Price - सोने-चांदीच्या दरात तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सराफ बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी सोने - चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर घसरण सुरू झाली होती त्याला ब्रेक लागला आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 194 रुपयांनी तर चांदीचे दर 1 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढले आहेत. एक किलो चांदीच्या दरात 1184 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी सोन्याचे दर 49 हजार 261 रुपये इतके होते तर चांदी 65 हजार 785 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीमुळे सोन्या चांदीचे दर वाढत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

चांदीच्या दरातही गुरुवारी वाढ झाली असून दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीची किंमत 1184 रुपयांनी वाढली. यामुळे एक किलो चांदीचा दर 65 हजार 785 रुपये इतका झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 25.63 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. 

गुरुवारी दिल्लीत सोन्याचे दर 194 रुपयांनी वाढल्यानं 10 ग्रॅम सोन्याचा दर 49 हजार 455 रुपये इतका झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यानंतर प्रति औंस सोन्याची किंमत 1874 डॉलरवर पोहोचली आहे. 

हे वाचा - मोबाईलपासून ते टिव्हीच्या सिग्नल्सचा दर्जा सुधारणारे सॅटेलाईट होणार लाँच

एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी म्हटलं की, सोन्या चांदीच्या आंतरराष्ट्री किंमतीचा परिणाम भारतीय बाजारातही झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेची उत्सुकता आहे. यामुळे डॉलरवर दबाव असून लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसत आहे.

हेही वाचा - ओवेसींचे ‘मिशन यूपी’सुरू;शिवपाल यादव यांनाही भेटणार

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्सच्या संकेतस्थळावर देशभरातील सोन्या चांदीचे सध्याचे दर दिले आहेत. या दरात आणि तुमच्या शहरातील दरांमध्ये थोडाफार फरक असू शकतो. IBJA ने जारी केलेल दर हे देशभरात सर्वसामान्य आहेत. मात्र वेबसाइटवर देण्यात आलेल्या रेटमध्ये जीएसटीचा समावेश नाही. सोनं खरेदी किंवा विक्रीवेळी IBJA च्या दराचा हवाला देता येतो. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्सन असोसिएशननुसार IBJA देशभरातील 14 सेंटरमधून सोन्या च्यांदीच्या सध्याच्या रेटपासून त्याचा सरासरी दर सांगते.
 

loading image
go to top