esakal | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

money

केंद्र सरकारमधील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. पण, यासंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून महत्त्वाची माहिती समजत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केंद्र सरकारमधील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. पण, यासंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून महत्त्वाची माहिती समजत आहे. आता महागाई भत्त्यावर असणारे निर्बंध हटवण्यात येणार आहेत. तसेच सध्याच्या महागाई भत्त्याच्या 17 टक्क्यांमध्ये वाढ होऊन ती 28 टक्के होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (good news central employees government da increase by 11 percent)

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता रोखण्यात आला होता. पण, आता केंद्रीय मंत्रिमंडळात महागाई भत्त्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. याआधी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळायचा. आता यात वाढ करुन तो 28 टक्के करण्यात आला आहे. म्हणजे यात 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे 'लय भारी'

1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यावर निर्बंध लादण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील बैठकीत यावरील निर्बंध हटवण्यात आले. या निर्णयाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. नियमानुसार 1 जानेवारी आणि 1 जुलै अशा सहा महिन्यांच्या अंतराने महागाई भत्ता दिला जातो. कोरोना महामारीचा देशात हाहाकार सुरु होता. त्यामुळे त्यांच्या भत्त्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

हेही वाचा: पावसाळी अधिवेशनापूर्वी 18 जुलैला सर्वपक्षीय बैठक

काय असतो महागाई भत्ता?

काळानुसार वस्तूंच्या किंमती वाढत जातात. महागाईमुळे असं होत असतं. अशावेळी पैशांची क्रयशक्ती कमी होते. याचा अर्थ लोकांच्या वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध येऊ शकतात. ज्याप्रमाणे वस्तूंची किंमत वाढत जाते, त्याप्रमाणे पैशांची क्रयशक्ती वाढत नाही. अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. यामुळे महागाईला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत मिळते.

loading image