विमान प्रवाशांसाठी खुशखबर; एअर इंडियामध्ये अत्याधुनिक ६ नवीन विमान होणार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर विमानाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एअर इंडियाने आणखी ६ बोईंग 'बी ७७७-३०० ईआर' वाइडबॉडी विमाने करारापद्धतीवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Air India : विमान प्रवाशांसाठी खुशखबर; एअर इंडियामध्ये अत्याधुनिक ६ नवीन विमान होणार दाखल

मुंबई - देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर विमानाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एअर इंडियाने आणखी ६ बोईंग 'बी ७७७-३०० ईआर' वाइडबॉडी विमाने करारापद्धतीवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बोईंग विमाने एअर इंडियाच्या विमान ताफ्यात सामील होणार असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहेत.

एअर इंडिया विमानसेवेचा ताबा केंद्र सरकारने टाटा समूहाकडे देण्यात आल्यानंतर, आता टाटा समूहाकडून एअर इंडिया कंपनीतील विमानाचा ताफ्यात वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. यापूर्वी ३० विमानांव्यतिरिक्त २१ एअरबस ए-३२०, चार एअरबस ए-३२१ आणि पाच बोइंग बोईंग 'बी ७७७-३०० ईआर' वाइडबॉडी विमानांचा समावेश आहे. आता आणखी सहा एअर इंडियाच्या बोईंग 'बी ७७७-३०० ईआर' वाइडबॉडी विमाने करारापद्धतीवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे करार पध्दतीने घेतलेल्या विमानाची संख्या ३६ वर पोहचली आहेत. वाइडबॉडी बोईंग विमानामध्ये फर्स्ट, बिझनेस, प्रीमियम असे चार-श्रेणी कॉन्फिगरेशन असणार आहे.

एअर इंडियाच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनेत जरी आता एअरलाइन नॅरो आणि वाइड बॉडी विमानांना भाडेतत्वावर घेण्यात वाढ करीत असली तरी या आधीच १९ लॉन्ग ग्राउंडेड विमानाने सुरू झाली आहे. आणखी ९ विमाने त्यासाठी सज्ज आहेत. या विस्तारचा एक भाग म्हणून एअर इंडियाने देशांतर्गत महत्त्वाच्या शहरांमधील विमानांची वारंवारता वाढविली आहे. दोहा, सॅन फ्रेंन्सिस्को, व्हॅन्कुवर, बर्मिंगहॅम सारख्या महत्वाच्या जागतिक स्थळांपर्यंत मुख्य भारतीय शहरांपासून थेट विमानसेवा सुरू केली आहे. या पुढे एअर इंडिया दिल्लीहून मिलान, व्हीएन्ना आणि कोपेनहेगन यांसारख्या प्रमुख यूरोपातील शहरांसाठी आणि मुंबई पासून न्यूयॉर्क, पॅरिस आणि फ्रँकफर्ट येथे थेट विमानसेवा चालू केली करणार आहे.

प्रतिक्रिया -

आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या विमानांची वारंवारता आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यामुळे आमच्या दीर्घकालीन विमानाच्या ताफ्याला लक्षणीय रीतीने वाढविण्याचे आणि त्यांच्यात पुन्हा नावीन्य आणण्याची योजना निश्चित केली आहे. त्याच्या एक भाग म्हणून आम्ही आणखी

६ बोईंग 'बी ७७७-३०० ईआर' वाइडबॉडी विमाने करारापद्धतीवर घेण्याचा निर्णय घेतला आहे

- कॅम्पबेल विल्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, एअर इंडिया

सध्या ११३ विमानाचा ताफा -

एअर इंडियाच्या नॅरो-बॉडी फ्लीटमध्ये सध्या ७० विमाने आहेत, त्यापैकी ५५ सेवेत आहेत; उर्वरित १६ विमाने अनुक्रमे २०२३ च्या सुरूवातीस पुन्हा सेवेत येतील. त्याचप्रमाणे एअर इंडियाच्या वाइड-बॉडी फ्लीटमध्ये सध्या ४३ विमाने आहेत, त्यापैकी ३३ कार्यरत आहेत. उर्वरित २०२३ च्या सुरुवातीला सेवेत परत येतील.

टॅग्स :TravelAir Indiaplane