दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिला दिलासा

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

सोने हे नेहमीच गुतवणूकदारांसाठी आकर्षक ऑप्शन राहिलेला आहे. अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना अलंकार आभूषणांची खरेदी करत असतात. त्यामुळे दागदागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सोने हे नेहमीच गुतवणूकदारांसाठी आकर्षक ऑप्शन राहिलेला आहे. अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना अलंकार आभूषणांची खरेदी करत असतात. त्यामुळे दागदागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दागदागिने खरेदीसंदर्भात सरकारने एक नवी अधिसूचना जारी केली आहे. आणि त्यानुसार दोन लोकांपेक्षा कमी किंमतीच्या दागिन्यांवर आता केवायसी संदर्भातील माहिती द्यावी लागणार नाही. 

ITR भरण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमएल अ‍ॅक्ट 2002 अंतर्गत वित्तीय ऍक्शन टास्क फोर्स लक्षात घेऊन 28 डिसेंबर 2020 रोजी नवी अधिसूचना जारी केली गेली आहे. आणि यानुसार दोन लाखांपेक्षा कमी किमतीच्या दागिने खरेदीवर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड द्यावे लागणार नाही. तर दहा लाखांपेक्षा अधिक दागिन्यांच्या खरेदीवर रोख व्यवहार करत असताना, विक्रेत्यांना ग्राहकांकडून केवायसी घेणे बंधनकारक राहणार आहे. मनी लॉन्ड्रीग आणि अन्य दहशतवादासाठी होणारी फंडिंग रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; होमलोनसाठी एसबीआयची ऑफर  

फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ही आंतरराष्ट्रीय मानकांची एक आंतरराज्यीय संस्था आहे. व या संस्थेचा उद्देश दहशतवाद्यांच्या निधी आणि मनी लॉन्ड्रीगच्या सारख्या कारवाया रोखण्याचा आहे. आणि 2010 पासून भारत एफएटीएफचा सदस्य आहे. त्यामुळे यापुढे दोन लाखांपेक्षा कमी किमतीचे दागिने खरेदी करताना कोणतीही केवायसी कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. तर आयकर कायदा 1961 च्या कलम 269ST नुसार दोन लाखांपेक्षा अधिक किमतीच्या रोख व्यवहारास मनाई आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for jewelry buyers The government gave relief