खुशखबर! स्टेट बॅंक ऑफ इंडियात बंपर भरती 

वृत्तसंस्था
Tuesday, 8 September 2020

स्टेट बँकेचे सध्या देशभरात 2.5 लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. भारतीय स्टेट बँकेला आपलं जाळं अजून वाढवून ती सामान्यापर्यंत पोहचवायचं आहे. यासाठीच आता स्टेट बॅंकेत मोठी भरती होणार आहे.

भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) यावर्षी बंपर भरती होणार आहे.  एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. तसेच तिच्या सर्वात जास्त शाखाही आहेत. या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांची मोठी गरज असल्याने यावर्षी State Bank of India मध्ये 14 हजार जागांसाठी भरती करणार आहे. स्टेट बँकेचे सध्या देशभरात 2.5 लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. भारतीय स्टेट बँकेला आपलं जाळं अजून वाढवून ती सामान्यापर्यंत पोहचवायचं आहे. यासाठीच आता स्टेट बॅंकेत मोठी भरती होणार आहे. इकडं दुसऱ्या बाजूला बँकेद्वारे ‘ऑन टॅप व्हीआरएस’ (On Tap VRS -Voluntary retirement scheme) या योजनेचे चर्चाही सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

VRS (Voluntary retirement scheme) नेमकं काय आहे? 
या अगोदर अशी माहिती समोर आली होती की, भारतीय स्टेट बँक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन VRS2020 अशी योजना आणली होती. यामध्ये जवळपास 30190 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ही योजना त्या कर्मचाऱ्यांसाठी होती,  ज्यांनी बँकेला आतापर्यंत आपल्या कामाची 25 वर्षे पुर्ण केली आहेत आणि ज्यांच वय 55 वर्षे असेल. ही योजना १ डिसेंबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या स्टेट बॅंकेला VRS कर्मचाऱ्यांच्य़ा रिक्त जागांवर हे नवीन कर्मचारी नियुक्त करणार आहे. याबाबतची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. 31 मार्च 2020ला एसबीआयमध्ये एकूण 2.49 लाख कर्मचारी काम करत आहेत.  आता हाच आकडा मार्च 2019 मध्ये 2.57 लाख इतका होता. खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news State Bank of India bumper recruitment