
जगातील आघाडीची सर्च इंजिन कंपनी असणाऱ्या गुगलमध्येही कामगार ऐक्याचे वारे वाहू लागले असून आता कंपनीमधील २२५ अभियंते आणि कामगारांनी मिळून कामगार संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या स्थापनेमुळे सिलिकॉन व्हॅलीमध्येही कामगार चळवळीचा शिरकाव झाल्याचे मानले जाते . माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारे व्हाइट कॉलर कामगार स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येणे ही घटनाच मुळात महत्त्वपूर्ण असल्याचे कॉर्पोरेट जाणकारांचे म्हणणे आहे.
ओकलँड (कॅलिफोर्निया, अमेरिका) - जगातील आघाडीची सर्च इंजिन कंपनी असणाऱ्या गुगलमध्येही कामगार ऐक्याचे वारे वाहू लागले असून आता कंपनीमधील २२५ अभियंते आणि कामगारांनी मिळून कामगार संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या स्थापनेमुळे सिलिकॉन व्हॅलीमध्येही कामगार चळवळीचा शिरकाव झाल्याचे मानले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारे व्हाइट कॉलर कामगार स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येणे ही घटनाच मुळात महत्त्वपूर्ण असल्याचे कॉर्पोरेट जाणकारांचे म्हणणे आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वेतनासंबंधीचे नियम, कामापोटी वरिष्ठांकडून होणारी छळवणूक आणि कंपनीकडून मागील काही वर्षांमध्ये मूल्यांशी केली जाणारी तडजोड यामुळे सध्या गुगलमधील कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. आता याच मुद्यावरून कंपनीचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
फास्टटॅग डिजिटल सिस्टीम होतीय लोकप्रिय; महिन्यात वाढले 1.35 कोटी व्यवहार
संघटनेचे स्वरूप
या नव्या संघटनेचे नाव हे ‘अल्फाबेट वर्कर्स युनियन’ असे ठेवण्यात आले आहे. या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षांचीही निवड करण्यात आल्याचे समजते.
Edited By - Prashant Patil