
राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या डिजिटल सिस्टीम फास्टटॅग मार्फत डिसेंबर महिन्यात झालेली वसुली 2,303.79 कोटी रुपये झाली. व डिसेंबर महिन्यात झालेली ही टोल वसुली मागील महिन्यापेक्षा (नोव्हेंबर) 201 कोटी रुपये अधिक झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या डिजिटल सिस्टीम फास्टटॅग मार्फत डिसेंबर महिन्यात झालेली वसुली 2,303.79 कोटी रुपये झाली. व डिसेंबर महिन्यात झालेली ही टोल वसुली मागील महिन्यापेक्षा (नोव्हेंबर) 201 कोटी रुपये अधिक झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) याबाबतची माहिती मंगळवारी जाहीर केली. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर डिजिटल सिस्टीमद्वारे टोल भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे एनएचएआयने म्हटले आहे.
अर्थचक्र सुधाराचे संकेत | इंधनाचा खप पूर्ववत होण्याच्या मार्गावर; 2019 च्या...
एनएचएआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार, फास्टटॅगच्या माध्यमातून होणाऱ्या टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झाली आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यात झालेली टोल वसुली ही नोव्हेंबर महिन्यापेक्षा 201 कोटी रुपयांनी अधिक असल्याचे एनएचएआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात टोल भरण्यासाठी झालेले व्यवहार 12.48 कोटी होते. व या व्यवहारातून 2,102,02 कोटी रुपये टोल वसुली झाली होती. तर डिसेंबर महिन्यात यात वाढ होऊन 13.84 कोटींची भर पडली असून 2,303.79 कोटी रुपये टोल वसुली झाली आहे.
नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2021 पासून राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी फास्टटॅगची अंमलबजावणी अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ज्यांनी अजूनही फास्टटॅग वापरण्यास सुरवात केलेली नाही अशांसाठी आणि त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची अतिरिक्त मुदत एनएचएआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर हायब्रीड लेन (रोख पेमेंट) ची सुविधा उपलब्ध असणार आहे. परंतु त्यानंतर टोल भरताना फास्टटॅग नसल्यास वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार असून, त्यासोबतच अशा वाहनांना थर्ड पार्टी विमा देखील देण्यात येणार नाही. टोलची प्रक्रिया आता संपूर्णपणे डिजिटल होणार असून, टोल प्लाझावरील रोख व्यवहार थांबवले जाणार आहेत.
Toll Transactions Through FASTag Records Significant Growth of 1.35 crore in December 2020. Read more here: https://t.co/puf6Bm9r8L#NHAI #BuildingTheNation pic.twitter.com/SUzZTO8CT2
— NHAI (@NHAI_Official) January 5, 2021