स्मार्ट माहिती : ‘टीसीएस’ची छाटणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TCS

झाड बहरावे, फुले-फळे लवकर व तजेलदार यावीत म्हणून हुशार माळी बागेतील झाडांची अधूनमधून छाटणी करीत असतो.

स्मार्ट माहिती : ‘टीसीएस’ची छाटणी

झाड बहरावे, फुले-फळे लवकर व तजेलदार यावीत म्हणून हुशार माळी बागेतील झाडांची अधूनमधून छाटणी करीत असतो. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात ‘टीसीएस’ या डवरलेल्या झाडाची छाटणी वारंवार करावी लागत आहे. कारण अमाप वाढीचा वेग!

आता ९ मार्च ते २३ मार्च या काळात टाटा समूहातील या प्रमुख कंपनीची ‘छाटणी’ केली जाणार आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ‘शेअर बायबॅक’ची आॅफर देऊ केली आहे. रु. १ मूळ किंमतीचा आणि रु. ३६०० बाजारभाव (११ मार्च) असलेला शेअर ही कंपनी रु. ४५०० ला विकत घेऊन आपले भागभांडवल रु. चार कोटींनी कमी करणार आहे. त्यामुळे कंपनीचा राखीव निधी रु. १८,००० कोटींनी कमी होणार आहे. असे असूनसुद्धा ही कंपनी ‘शेअर बायबॅक’नंतर आणखी सुधारणार आहे. कसे ते पाहा-

बाजारभाव रु. ३६००

उच्चांकी भाव रु. ४०४३

नीचांकी भाव रु. २९८७

‘बायबॅक’पूर्वी

भांडवल रु. ३७० कोटी

राखीव निधी रु. ८६०६३ कोटी

प्रमाण २३२.६० पट

‘बायबॅक’नंतर

भांडवल रु. ३६६ कोटी

राखीव निधी रु. ६८०६३ कोटी

प्रमाण २४९.११ पट

अशी आहे करामत ‘टीसीएस’च्या ‘छाटणी’ची!

(लेखक शेअर बाजाराचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Web Title: Gopal Galgali Writes Smart Information Tcs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TCSGopal Galgali
go to top