सरकार, कर्जदात्यांची देणी चुकती

पीटीआय
Tuesday, 9 July 2019

व्यवसायातून बाहेर पडण्याचे कारण
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने बाजारात एन्ट्री केल्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेसचा तोटा वाढला होता. त्यामुळे या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय टाटा समूहाने घेतला. जिओमुळे दूरसंचार क्षेत्रातील अनेक कंपन्यांना एकतर या व्यवसायामुळे बाहेर पडणे किंवा प्रतिस्पर्धी कंपनीत विलीन व्हावे लागले. कुमारमंगलम बिर्ला यांच्या आयडिया सेल्युलरचेसुद्धा व्होडाफोनमध्ये नुकतेच विलीनीकरण झाले आहे.

नवी दिल्ली - टाटा समूहाने सरकार आणि कर्जदात्यांची सुमारे ५० हजार कोटी रुपयांची देणी चुकती करून आपल्या मोबाईल व्यवसायाची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. टाटा समूहाने टाटा टेलिसर्व्हिसेस लि.चा व्यवसायाचे सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय ऑक्‍टोबर २०१७ मध्ये घेतला होता. 

गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाला देय असलेले १० हजार कोटी अदा केल्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेवर असलेल्या ४० हजार कोटी रुपये थकीत कर्जाचाही भरणा टाटा समूहाकडून करण्यात आला आहे, अशी माहिती टाटा सन्स लिमिटेडने दिली.

दरम्यान, टाटा टेलिसर्व्हिसेसवरील सर्व थकित कर्जांची परतफेड करण्यात आल्यामुळे भारती एअरटेलसोबतचा करार आता पूर्णत्वास गेला आहे. या करारानुसार, १ जुलैपासून टाटा टेलिसर्व्हिसेस आता भारती एअरटेल व भारती हेक्‍साचा (एअरटेल) भाग बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Borrower Money Tata Group